खूप काही

रात्रीस खेळ चाले भाग 3 : अण्णा नाईक मेल्यापासून कसे मेल्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि आता पुढे…

वाचक मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ तिच्या तिसऱ्या भागासह लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अण्णा परत येणार? असे होल्डिंग महाराष्ट्रातील चौक चौकात दिसत होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता रंगली होती. (The third episode of the ratris khel chale will be released soon)

काही दिवसांपासून झी मराठीवर याचे प्रोमोजसुद्धा दाखवले जात आहेत. या प्रोमोजमध्ये अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर यांचा भयावह आवाज आणि अंदाज पाहायला मिळतो आहे. (Ratris khel chale 3 is all set to launch)

 रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या  भागामध्ये अण्णा नाईक मालिकेच्या सुरवातीलाच मेलेले दाखवले आहेत, मालिकेच्या दुसऱ्या भागात अण्णा नाईक कसे मेले यमागचं गूढ दाखवण्यात आलं. नाईक वाड्याचा भूतकाळ आणि वर्तमान या दोन सिजन्समधून प्रेक्षकांना पाहायला मिळाला.


आता तिसऱ्या सिजन मध्ये काय असणार? अण्णा नाईकांचं भूत या सिजन्समध्ये पाहायला मिळणार का? सर्वांची लाडकी शेवंता दिसण्याची शक्यता आहे का ? मालिकेचं एकूणच कथानक काय असणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. परंतु निर्मात्यांनी यासर्वांची उत्तर अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहेत.

निर्मात्यांनी ETimes Tv ला दिलेल्या मुलाखती मध्ये सांगितले, “हो, मी आम्ही रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिसऱ्या भागासोबत परत येत आहोत. लोकांच्या प्रचंड प्रतिसाद पाहून आम्ही रात्रीस खेळ चाले चा तिसरा भाग सादर करण्याचा विचार केला आहे. पहिल्या 2 सिजन्स सारखाच हा सिजनसुद्धा रोमांचक वळणांनी भरलेला असणार आहे.

मालिकेतील सर्व पात्रांबद्दल आम्ही आता काहीच सांगणार नसलो तरीही माधव अभ्यंकर अण्णा नाईक म्हणून पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. हा सिजन पूर्णपणे रोमांचक, भीतीदायक कथानकाने भरलेला असणार आहे, सोबतच प्रेक्षकांसाठी एक स्पेशल सरप्राइससुद्धा असणार आहे.

रात्रीस खेळ चालेच्या  भाग तिनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असली तरीही मालिकेच्या वेळेवरून प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. देवमाणूस मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने ही मालिका निरोप घेणार नाही, असं दिसतंय, ज्यामुळे रात्रीस खेळ चालेसाठी वाहिनीला थोडी तडजोड करावी लागली आहे. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments