खूप काही

दहावी उत्तीर्ण आहात मग ही सरकारी नोकरी तुमचीच !

रिझर्व्ह बँकेत ऑफिस अटेंडेंटच्या पदासाठी शेकडो पदे भरली जाणार आहेत. याचमुळे दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी उपलब्ध होणार आहेत. या पदांसाठी कसा अर्ज कार्याचा? पात्रता काय? पगार किती? चला जाणून घेऊयात. (RBI Office Attendant Recruitment )

संपूर्ण देशात रिझर्व्ह बँकेद्वारे ऑफिस अटेंडेंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. या पदासाठी ८०० पेक्षा जास्त जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्णांसाठी एक सुवर्णसंधी उपल्बध झाली आहे. या भरती अंतर्गत देशातील अनेक प्रदेशात पदे भरली जाणार असल्याने तुम्हाला तुमच्या प्रदेशानुसार नोकरीसाठी अर्ज करण्याची मुभा आरबीआय ने दिली आहे.

राज्य आणि उपलब्ध पदसंख्या :

कानपुर – ६९ पदे
अहमदाबाद – ५० पदे
बंगळुरू – २८ पदे
भोपाळ – २५ पदे
भुवनेश्वर – २४ पदे
चंदीगड – ३१ पदे
चेन्नई – ७१ पदे
गुवाहाटी – ३८ पदे
हैद्राबाद – ५७ पदे
जम्मू – ९ पदे
जयपूर – ४३ पदे
कोलकाता – ३५ पदे
मुंबई – २०२ पदे
नागपूर – ५५ पदे
नवी दिल्ली – ५० पदे
पाटणा – २८ पदे
तिरुवनंतपूरम – २६ पदे

या पदासाठी पगार किती असेल?

दरमाह १०,९४० रुपये ते २३, ७०० रुपये इतका पगार या पदांसाठी देण्यात येणार आहे.

पात्रता काय असायला हवी ?

मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे. वयोमर्यादा १८ ते २५ अशी आहे. आरक्षित वर्गाला कमल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

कसा करावा अर्ज ?

आरबीआय ची वेबसाईट rbi.org.in या द्वारे अर्ज करायचा आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी ४५० रुपये आणि एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे.

या तारखा ठेवा लक्षात !

ऑनलाईन अर्ज सुरु – २४ फेब्रुवारी २०२१ 

ऑनलाईन अर्जाची मुदत – २५ मार्च २०२१ 

परीक्षेची तारीख – ९ एप्रिल आणि १० एप्रिल २०२१ 

नोट 

निवड ही ऑनलाईन आणि लॅंग्वेज प्रोफेशिएन्सी टेस्ट आधारे केली जाईल. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments