खूप काही

Chanakya Niti : संकटात चाणक्याच्या ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा, कोणतीच अडचण येणार नाही…

आचार्य चाणक्य यांना राजकारणातील आणि मुत्सद्देगिरीतील महान तज्ज्ञ मानले जाते. त्याच्या बुद्धीने चंद्रगुप्तला कुशल शासक म्हणून प्रस्थापित केले होते. आजच्या काळात चाणक्यांनी सांगितलेल्या बऱ्याच अशा गोष्टी सत्य झालेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीने चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन केल्या तर त्या व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही किंवा कोणतीही अडचण येत नाही.

आयुष्यात म्हंटले तर संकट आणि वाईट वेळ ही कधीना कधीतरी येते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी चाणक्य यांनी चाणक्य नीति ग्रंथात या तीन गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यच्या त्या तीन गोष्टींबद्दलही तुम्हीही माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही सर्व अडचणींना सहजपणे सामोरे जाऊ शकता.

1.जीवनात जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा मनाचे लक्ष विचलित करू नका. विचलित झालेले मन कधीही अचूक निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून धीर धरा आणि आपले कुटुंब, मित्र आणि जवळच्या व्यक्तींना एकत्र ठेवा. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बुद्धीने स्वत: च्या मनाने कार्य केले तर त्याला सर्वात मोठे संकटाला तोंड द्यावे लागते. आणि त्याच त्रासावर सहज विजय मिळवू शकतो.

२. आचार्य चाणक्यच्या म्हणतात कोणत्याही किंवा कसल्याही परिस्थितीत नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नकारात्मक विचारांमुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आपण कोणत्याही मोठ्या अडचणीत सापडलो तरी संकटाच्या वेळी एकट्याने काय करू शकतो याचा विचार करू नका.

अश्या वेळी मन शांत ठेऊन सकारात्मकतेसह परिस्थिती समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. पूर्ण सामर्थ्याने संकटाचा मुकाबला करा. लक्षात ठेवा कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी धैर्य आणि समजूतदारपणा दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत. जर तुमच्या मनात नकारात्मक भावना येत असतील तर कोणताही निर्णय घेण्याची अथवा हिंमतिने काम करण्यासाठी तुम्ही सक्षम नसता.

3. कठीण काळात लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. घाईघाईत बर्‍याच वेळा आपल्याला परिस्थिती पूर्णपणे समजत नाही आणि आपण चुकीचा निर्णय घेतो. म्हणून सर्व बाजूंनी समस्या ही काळजीपूर्वक पाहने खूप गरजेचे असते. त्याच्या कारणास्तव आणि प्रतिबंधाबद्दल आपण आत्मपरीक्षण करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments