फेमस

Test Cricket Ahmedabad: ऋषभ पंतने एका शतकाने बनवले 3 नवीन रेकॉर्ड, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्याशी बरोबरी

ऋषभ पंतने चौथ्या टेस्ट मध्ये इंग्लंड विरोधात अहमदाबाद मध्ये शतक लावला. त्याने 101 रन बनवले. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने 7 wicket घेत 294 रन बनवले. ऋषभ पंतने त्या शतकाने नवीन रेकॉर्ड बनवले.

ऋषभ पंत गेल्या 5 टेस्ट मध्ये 3 वेळा शतक बनवता बनवता राहून गेला पण आता चौथ्यांदा तो यशस्वी झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीमध्ये त्याने 97 आणि ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 91 धावांची खेळी केली. आता त्याने अहमदाबादमध्ये शतक रोवलेच. हे त्याचे भारतातील पहिले शतक आहे.,

एडम गिलक्रिस्टनंतर ऋषभ पंत एकटा असा दुसरा wicketkeepar फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात शतक ठोकले आहे. शतकात ऋषभ पंतने जेम्स अँडरसनविरूद्ध reverse sweep केला. 2014 नंतर हा शॉट अँडरसनला देणारा तो पहिला खेळाडू आहे.

ऋषभ पंतने दुसऱ्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये षटकाच्या आधारे शतक पूर्ण केलं.हे करून त्याने गौतम गंभीर आणि रोहित शर्माची बराबरी केली.भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर षटकाच्या आधारे शतक पूर्ण करण्यात आघाडीवर आहे, ज्याने सहा वेळा हा पराक्रम केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments