आपलं शहर

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला, जाणून घ्या काय आहेत नवीन दर

पेट्रोल-डिझेलची वाढती महागाई मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावते आहे, तोच आता रिक्षा आणि टॅक्सी यांच्या प्रवासाचे दर सुद्धा वाढले आहेत. आजपासून मुंबई मधील रिक्षाचे भाडे जे 18 रुपये होते ते 21 रुपये होणार आहे. तर टॅक्सीचे भाडे 22 रुपत्यांवरून 25 रुपये होणार आहे. तसेच कूल कॅब चे भाडे 28 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे. नाईट चार्जेस मध्यरात्री 12 वाजल्या पासून सकाळी 5 वाजे पर्यंत लागू होणार आहे. 

मुंबई मधील 4.6 लाख रिक्षा आणि जवळपास 60 हजार टॅक्सी मीटर रिकोलॅब्रेशन साठी जाणार असून मीटर उपग्रडे करण्यासाठी चालकांना 700 रुपये इतका खर्च येणार आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया सोपी करण्यात येणार आहे. 

रिक्षा आणि टॅक्सी युनियन ने भाडे वाढ निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोना मुळे गेल्यावर्षी मार्च पासून जून पर्यंत अनेक चालकांना खूप नुकसान सहन करावे लागले. त्याचीच कसर या भाडेवाढीमुळे होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

समाजातील एका गटाला या निर्णयचा फायदा जरी होणार असला तरीही माध्यम वर्गीयांच्या खिशाला कात्रीची मोठी धार लागली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचे अजून किती हाल होणार आहेत हे कोणालाच कळणार नाही. परंतु कदाचित यामुळे सरकारी बसेसची मागणी वाढू शकते.  

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments