खूप काही

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 चं नवीन मॉडेल भारतात लॉन्च…

आजपासून या दोन्ही बाईकची बुकिंग सुरू केली आहे.

रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) ही आपल्या बाईकसाठी नावाजलेली कंपनी आहे. ग्राहकांच्या गरजा बघता कंपनीने अनेकदा मॉडेल्स अपग्रेड केले आहेत. यावेळी कंपनीने इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650 बाईक ला BS6 इंजिन बरोबर अपग्रेड करून बाजारात आणले आहे.

इंटरसेप्टर INT 650 सात रंग पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. कॉन्टिनेन्टल जीटी 650 मध्ये नवीन थिम देण्यात आली आहेत. इंटरसेप्टर 650 ची किंमत 2 लाख 75 हजार 407 रुपये आहे. कस्टम कलरशिवाय याची किंमत 2 लाख 83 हजार 593 रुपये आहे. कॉन्टिनेन्टल GT 650 च्या स्टॅण्डर्ड कलरवेज बाइकची किंमत 2 लाख 91 हजार 701 रुपये आहे. आजपासून या दोन्ही बाईकची बुकिंग सुरू केली आहे.(Royal Enfield new model launch)

इंटरसेप्टर 650
ऑरेंज क्रश, सिल्वर स्पेक्टर, मार्क 3 या रंगाच्या बाईक ची किंमत 2 लाख 64 हजार 919 रुपये, रैविशिंग रेड, बेकर एक्सप्रेस या रंगाच्या बाईकची किंमत 2 लाख 72 हजार 806 रुपये, ग्लिटर, डस्ट या रंगाच्या बाईकची किंमत 2 लाख 85 हजार 951 रुपये आहे.

कॉन्टिनेंटल जीटी 650
ब्लैक मैजिक या रंगाची किंमत 2लाख 80 हजार677 रुपये, मेहेम आणि आइस क्विन वाइटची किंमत 2 लाख 88 हजार 564 रुपये, मिस् क्लीन क्रोम या रंगाची किंमत 2 लाख 92 हजार 092 रुपये आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments