कारण

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, : काँग्रेस प्रवक्त्यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या संदर्भांत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीकेचं क्षेपण अस्त्र उगारले आहे. तामिळनाडू, कर्नाटकसह अन्यकाही राज्यांनी देखील 50 टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांनाही नोटीस आठव्यांची विनंती महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकिल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. ती मेनी करण्यात आली आहे.(sachin sawant alleged modi government)

न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्टरातील काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक विडिओ ट्विट करून मोदी सरकारवर टीकेच क्षेपणास्त्र उगारला आहे. ‘ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं पूर्णपणे राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. 102 व्य घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारने, म्हणजेच तत्कालीन फडणवीस सरकारनं केलेला कायदा योग्य नाही व राज्यांना आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकारच राहिला नाही, असं केंद्राने न्यायालयाला सांगितल होत. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना अटर्नी जनरलनी भेट देखील नाकारली होती. राज्य सरकारनं बोलावलेल्या बैठकीला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद अनुपस्थित होते. त्यावरूनच या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे रंग दिसले होते.’ अशी टीका सावंत यांनी केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments