कारण

Sachin Vaze: सचिन वाझेंनी केले पुरावे नष्ट? NIA चा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर लगेचच वाझेंना एनआयएने अटक केली होती. तसेच त्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार निलंबित एपीआय सचिन वाझे यांनी या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. NIAची टीम वाझे यांच्या ठाण्यातील साकेत सोसायटीतील घरी कालपासून झडती घेत आहे. यामध्ये त्यांनी वाझेंच्या घरातील काही महत्वाच्या गोष्टी हस्तगत केल्या आहेत.

CCTV फुटेज आहे तरी कुठे?
सचिन वाझे ठाण्यातील ज्या साकेत सोसायटीत राहतात, त्याचे CCTV फुटेज बाबतचा डीव्हीआर काही दिवसांपूर्वीच वाझेंच्या सहकाऱ्यांनी मिळवला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे NIA आणि एटीएसला CCTV फुटेज अजूनही मिळाला नाही आहे. याच अनुषंगाने आज एनआयएने चौकशी केली आहे.

तांत्रिक मुद्यांवर तपास
सध्या तांत्रिक मुद्यांवर तपास करण्यात येत आहे. इनोव्हा कार कुठ कुठे जात होती, वाझे कोणाकोणाला भेटले, यावर सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, मनसुख हिरेन ज्या लोकांना भेटत होते त्याचा तपास तांत्रिक आधारावर करण्यात आला आहे. यामुळेच NIAला साकेत सोसायटीच्या CCTV फुटेजची गरज आहे.

दरम्यान CCTV फुटेज बाबतचा डीव्हीआर मिळवण्यासाठीचा अर्ज सचिन वाझेंचे विश्वासू अधिकारी रियाज काझी यांनी दिला होता आणि तो डीव्हीआर त्यांनी नेला होता. मात्र तो अजूनही परत मिळाला नाही.

रियाज काझी यांना आज सकाळीच NIAने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी चालू आहे. डीव्हीआरच्या मुद्यावर त्यांची चौकशी चालू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments