फेमस

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने सोडलं मौन, त्याने फसवल्याने झाला ब्रेकअप…

सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somi Ali) ने त्यांच्या ब्रेकअप बद्दल अनेक वर्षांनंतर भाष्य केलं आहे.

सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somi Ali) वयाच्या 16 व्या वर्षी भारतात काही चित्रपट केले, मात्र सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सोमी येथून निघून मायामीमध्ये स्थायिक झाली. ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर सलमान खानने आपली फसवणूक केल्याचे उघड केले आहे.

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सोमी अलीने काही चित्रपटांद्वारे एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यावेळी सलमान खानबरोबरच्या तिच्या नात्याबाबत ती अजूनही चर्चेत आहे. आता झूमवरील (Zoom) एका मुलाखतीत सोमी अलीने सलमानपासून ब्रेकअपपर्यंत तिच्या आयुष्याविषयी, करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.

या संभाषणात सोमी म्हणाली, ‘मला त्याच्याबरोबर ब्रेकअप होऊन आता 20 वर्षे झाली आहेत. त्यांनी माझी फसवणूक केली आणि मी त्याच्यापासून दूर गेले. त्यानंतर मी इथून निघाले. पुढे 5 वर्ष सलमानशी ती बोलली नाही. आपला मुद्दा पुढे करत सोमी म्हणाली, ‘मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात आले नव्हते. माझ्या ex बरोबर ब्रेकअप झाला होता म्हणून येथे राहण्याचा माझा हेतू नव्हता.

Somi पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार का?

जेव्हा सोमी अलीला (Somi Ali) विचारले गेले की ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा विचार आहे का? तर ती म्हणाली की, ‘नाही, मला काही रस नाही. मी या इंडस्ट्रीत पुन्हा येणार नाही.

सोमी अलीच्या म्हणण्यानुसार 1991 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी ती भारतात आली होती कारण तिला सलमान खानशी लग्न करावे लागले होते. हे नाते फार काळ टिकू शकले नाही. ज्यानंतर दोघांनी 1999 मध्ये ब्रेकअप केले. त्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी गेली.

आतापर्यंत या चित्रपटांमध्ये काम केले-

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने अंत (1994), कृष्णा अवतार (1993), यार गद्दार (1994), तीसरा कौन? (1994)या चित्रपटात काम केले आहे .

वयाच्या 14 व्या वर्षी बलात्कार झाला होता-

पूर्वी सोमी अली (Somi Ali )ने दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा ती पाकिस्तानात 5 वर्षांची होती तेव्हा तीच्या नोकरानेच तीच्यावर 3 वेळा अत्याचार केला होता. जेव्हा ती 9 वर्षांची होती तेव्हा चौकीदारानेही तीचा विनयभंग केला होता. ती अमेरिकेत राहत होती आणि जेव्हा मी 14 वर्षांची होती, तेव्हा एका 17 वर्षीय मुलाने एका पार्कमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ती भारतात 16 ते 24 वर्षांच्या दरम्यान होतो,त्यावेळी तिच्यासोबत घरगुती हिंसाचाराच्या बर्‍याच घटना घडल्या असे तिने सांगितले .

सोमी अली आता सध्या काय करत आहे ?

सोमी अली ‘नो मोअर अश्रू'(No More Tears) नावाचा एक एनजीओ चालविते. या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत, भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतील महिलांना त्यांचे पुनर्वसन करून लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाचे बळी बनवण्यापासून वाचवत आहे. अनेक महिलांना ती आधार देत आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments