कारण

‘त्यांना फक्त बंगाल मध्ये होणारे बीजेपी कार्यकर्त्यांवरील हल्लेच दिसतात’ : महाराष्ट्र- कर्नाटक वादावर संजय राऊत झाले आक्रमक

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा एकदा पेट घेताना दिसत आहे.  गेल्या काही दिवसांपासून बेळगावातील मराठी भाषिकांना त्रास देण्यात येत आहे.  बेळगावातील मराठी भाषिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत असताना ही केंद्र सरकार यावर काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. (Sanjay raut gets angry on central government over the Maharashtra- karnatak issue )

संजय राऊत म्हणतात, ‘त्यांना फक्त बंगाल मध्ये होणारे बीजेपी कार्यकर्त्यांवरील हल्लेच दिसतात. परंतु बेळगावात होणारे मराठी भाषिकांवरचे हल्ले मात्र कोणाला दिसत नाहीत. बेळगावात गेल्या आठ दिवसांपासून मराठी भाषिकांवर हल्ले होत आहेत.’

सोबतच ‘मी आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करतो की त्यांनी सर्वदलातील प्रतिनिधी मंडळा सोबत कर्नाटकात जाऊन आपल्या लोकांवर होणार्‍या हल्ल्याबाबत सवाल उपस्थित करावा’ असे ही विधान संजय राऊत यांनी केले.

बेळगाव कोणाचे या मुद्द्यावरून गेले सत्तरहून अधिक वर्षे महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाद चालु आहेत.  राज्य सीमांचा मुद्दा केंद्राच्या अधीन असतो. परंतु आता पर्यंत केंद्राने याबाबत काहीच निर्णय न घेतल्याने हा वाद अधिकच चिघळत चालला असून हिंसक रूप घेत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments