आपलं शहर

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची आत्महत्या; पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता ही गाडी ठाण्याचे रहिवासी मनसुख हिरेन यांची असल्याचे पोलिसांना कळाले. त्याप्रमाणे पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आज ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे.

मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची कुणीतरी हत्या केली आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनीच हिरेन यांनी आत्महत्याच केली आहे असे म्हंटले आहे. प्राथमिक तपासात हे आढळून आले आहे की हिरेन यांनी आत्महत्याच केली आहे.

कालपासून मनसुख हिरेन हे बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबाने याची तक्रार नौपाडा पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, आज मुंब्रा रेतीबंदर येथे त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments