खूप काही

ठरलं… या तारखेपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन, आरोग्यमंत्र्यांचे संकेत…

२-3 एप्रिलपासून महाराष्ट्रात मर्यादित कालावधीसाठी दुसरा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो.

२-3 एप्रिलपासून महाराष्ट्रात मर्यादित कालावधीसाठी दुसरा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर प्रशासनान देखील लॉकडाऊनसाठी सज्ज आहे .

मागील वर्षाच्या तुलनेत लॉकडाऊनचा कालावधी कमी असण्याची अपेक्षा आहे, त्याच बारोबर गर्दी रोखण्यावर मर्यादा येणार असून गर्दी रोखली जाईल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल.राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आहे. मिड-डेच्या वेबसाईटने शासकीय सूत्रांचा हवाला देऊन ही बातमी दिलीय.(second lockdown in mumbai)

हे लॉकडाऊन पूर्वीसारखे होणार नसल्याने कोणत्याही प्रकारचे कामकाज थांबणार नाही. अर्थव्यवस्थेची घडी बिघडली जाणार नाही याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जाणार आहे. लोकांची ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते अशी ठिकाणे बंद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. लॉकडाऊन लागू झाल्यास मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तसेच दुकानांसाठी विशिष्ट वेळा दिल्या जातील. तसेच मोठ्या बाजारपेठा ठरलेल्या वेळेपुरत्याच चालू राहतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोनाबाबत चर्चा करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाउनसारखे उपाय न केल्यास राज्यातील मृत्यूचा दर वाढू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. राज्यात कोविडबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले असून, ही स्थिती अशीच राहिल्यास प्रशासनाने लॉकडाउन लागू करण्याबाबत तयारी सुरू करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्यात रुग्णालयांमधील बेडची तसेच इतर सोयी सुविधांची कमतरता कमी असल्याने कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल अशी चर्चा बैठकीत करण्यात आलेली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments