कारण

COVID-19 Vaccination: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आज घेतली कोरोनाची लस..

आजपासून संपूर्ण देशात 60 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कोविडची लस घेत या टप्प्याची सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी सर्वांना ही लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे आज देशातील काही प्रमुख नेत्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज मुंबईतील जे.जे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील कोविडची लस घेतलेले पहिले नेते ठरलेले आहेत. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आज कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments