आपलं शहर

मुंबईत भूमाफियांचा सुळसुळाट; कोरोना काळात अवैध बांधकामांचे वाढले प्रमाण

कोरोना महामारीमुळे सर्व जगात हाहाकार मजला असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योग धंदे ठप्प झाले. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण एक उद्योगिक क्षेत्र असं होत ज्याचे काम खूप जोरदार चालू होते ते क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र. कोरोना महामारी च्या काळात मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा सुळसुळाट झाला होता. या भूमाफियांनी कोरोना काळातील बंदाचा पुरेपूर फायदा करून घेतला. 25 मार्च 2020 पासून 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत तब्बल 9558 अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. (Shakil Ahemad shaikh alleged BMC over the issue of Illegal Construction.)

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अतिक्रमण व निर्मूलन शहरे कार्यालयाकडे ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार नोंदवली आहे. माहिती नुसार 25 मार्च 2020 पासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन तक्रार प्रणालीवर एकूण 13325 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील 9558 तक्रारी अनधिकृत बांधकाम करण्यासंबंधी असून 3767 दुबार तक्रारी आहेत. तर फक्त 466 अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही करण्यात आली आहे. सर्वात जास्त एकूण 3251 तक्रार एल विभागात नोंद झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता (अति.नि.) शहरे यांनी दिली आहे.

कोणते विभागात किती तक्रार व अनधिकृत बांधकाम आणि निष्कासन कारवाई!

A विभागात एकूण 32 तक्रार, 8 दुबार तक्रार, 24 अनधिकृत बांधकाम, फक्त 1 निष्कासन कारवाई.

B विभागात एकूण 368 तक्रार, 186 दुबार तक्रार, 182 अनधिकृत बांधकाम, फक्त 2 निष्कासन कारवाई.

C विभागात एकूण 614 तक्रार, 225 दुबार तक्रार, 389 अनधिकृत बांधकाम, फक्त 24 निष्कासन कारवाई.

D विभागात एकूण 151 तक्रार, 73 दुबार तक्रार, 78 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई.

E विभागात एकूण 579 तक्रार, 143 दुबार तक्रार, 436 अनधिकृत बांधकाम, तसेच एकही निष्कासन कारवाई झाली नाही .

F/NORTH विभागात एकूण 148 तक्रार, 58 दुबार तक्रार, 90 अनधिकृत बांधकाम, फक्त 9 निष्कासन कारवाई.

F/SOUTH विभागात एकूण 297 तक्रार, 83 दुबार तक्रार, 214 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई.

G/NORTH विभागात एकूण 203 तक्रार, 23 दुबार तक्रार, 180 अनधिकृत बांधकाम, फक्त 7 निष्कासन कारवाई.

G/SOUTH विभागात एकूण 212 तक्रार, 90 दुबार तक्रार, 122 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई.

H/EAST विभागात एकूण 451 तक्रार, 219 दुबार तक्रार, 232 अनधिकृत बांधकाम, फक्त 11 निष्कासन कारवाई.

H/WEST विभागात एकूण 525 तक्रार, 96 दुबार तक्रार, 429 अनधिकृत बांधकाम, फक्त 21 निष्कासन कारवाई.

K/EAST विभागात एकूण 441 तक्रार, 46 दुबार तक्रार, 395 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई.

K/WEST विभागात एकूण 342 तक्रार, 40 दुबार तक्रार, 302 अनधिकृत बांधकाम, फक्त 58 निष्कासन कारवाई.

L विभागात एकूण 3251 तक्रार, 1249 दुबार तक्रार, 2002 अनधिकृत बांधकाम, फक्त 52 निष्कासन कारवाई.

M/EAST विभागात एकूण 1194 तक्रार, 20 दुबार तक्रार, 1174 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई.

M/WEST विभागात एकूण 1213 तक्रार, 526 दुबार तक्रार, 687 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई.

N विभागात एकूण 280 तक्रार, 40 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.

P/NORTH विभागात एकूण 429 तक्रार, 87 दुबार तक्रार, 342 अनधिकृत बांधकाम, फक्त 62 निष्कासन कारवाई.

P/SOUTH विभागात एकूण 416 तक्रार, 183 दुबार तक्रार, 233 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.

R/NORTH विभागात एकूण 595 तक्रार, 90 दुबार तक्रार, 505 अनधिकृत बांधकाम, फक्त 14 निष्कासन कारवाई.

R/SOUTH विभागात एकूण 348 तक्रार, 34 दुबार तक्रार, 314 अनधिकृत बांधकाम, सर्वात जास्त 75 निष्कासन कारवाई.

R/CENTRAL विभागात एकूण 398 तक्रार, 202 दुबार तक्रार, 196 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.

S विभागात एकूण 589 तक्रार, 37 दुबार तक्रार, 552 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई.

T विभागात एकूण 249 तक्रार, 9 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते शिवसेना बदल्याच्या भावनाने अभिनेत्री कंगना राणावतच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिका कार्यवाही केलेली आहे पण मुंबईत लाखो अनधिकृत बांधकामावर कार्यवाही कधी करणार असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिका अवैध बांधकामावर दरवर्षी 15,000 पेक्षा अधिक नोटीस बजावते, त्यातील काही अनधिकृत बांधकामाला नोटीस सुद्धा देण्यात येते नाही. त्यात फक्त 10 ते 20% अवैध बांधकामावर निष्कासन कारवाई केली जाते. तर काही अवैध बांधकामावर बोगस कारवाई सुद्धा दखविले जाते. उर्वरित अवैध बांधकामावर मनपा कधी कारवाई करणार? महापालिका आयुक्तांनी बेकायदेशीर बांधकामसाठी जबाबदार किती अधिकाऱ्याना निलंबित केले आहे? असा जाब शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments