कारण

शिवसेनेचं ठरलं, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वाघिणीला पाठींबा द्यायचं…

आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीमध्ये शिवसेना उमेदवार उभे करणार नाही अशी घोषणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना ही निवडणूक जरी लढणार नसली तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल निवडणूकीत धोबीपछाड देण्यासाठी याआधीच राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी आदि पक्षांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज त्यांच्या ट्विटर हँडलवरून तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिल्याची माहिती दिली आहे. “अनेकजण उत्सूक होते की शिवसेना पश्चिम बंगाल निवडणूक लढविणार आहे की नाही? तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की शिवसेना ही निवडणूक लढवणार नाही. या निवडणूकीत शिवसेना ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी राहणार आहे,” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments