खूप काही

KDMC विरोधात आंदोलन करणं दुकानदारांना भोवलं, 100 जणांवर FIR दाखल

100 हून अधिक दुकानदारांवर कल्याण डोंबिवली महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

पार्श्वभूमिवर राज्यात सगळीकडे रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे रात्री 8 वाजल्यानंतर सगळी दुकाने बंद करण्याचा निर्णय केडीएमसी महापालिकेने घेतला असताना काही दुकानदारांनी याविरोधात आवाज उठवला आहे.

रात्री 8 च्या ऐवजी अजून काहीवेळ दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, या मागणीने काही दुकानदारांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे आंदोलन 100 दुकानदारांना भोवलं आहे.(FIR against over 100 shopkeepers)

आंदोलन करताना कोरोनाचे नियम पाळले नाहीत, जमावबंदीचा आदेश लागू असताना अनेक लोक एकत्र आले, अशा कारणाने डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी 100 हून अधिक दुकादारांनी केडीएमसीच्या निर्णयाविरोधात पालिकेसमोर निषेध व्यक्त केला, तर काही ठिकाणी रास्ता रोखो करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या विरुद्धात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्नदेखील आंदोलनाठिकाणी करण्यात आला होता.

केडीएमसीने गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी शहरातील सर्व दुकाने बंद राहतील, फक्त अत्यावश्यक सुविधा चालू राहतील, असा निर्णय घेतला होता. सोबतच भाजी मंडईत फक्त 50 टक्के दुकाने सुरु राहतील, असाही निर्णय पालिकेकडून घेण्यात आला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments