आपलं शहर

JEE Main Result 2021: मुंबईच्या सिद्धांत मुखर्जीने तोडले सर्व रेकॉर्ड चक्क मिळवले 100%

JEE म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षे चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मुंबईतील सिद्धांत मुखर्जीने आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत 100% आणि 300 पैकी 300 गुण मिळवले आहेत. ( JEE Mains Result 2021 Topper Siddhant Mukharjee. Siddhant Mukharjee scores 100% at JEE Mains. )

मुंबईतील सिद्धांत 2019 मध्ये त्याच्या शिक्षणासाठी कोटा येथे गेला होता. तिथेच राहून त्याने त्याच शिक्षण पूर्ण केलं, सिद्धांत ने आपल्या यशाचं श्रेय आपल्या आई वडील आणि शिक्षकांना दिल आहे.आपल्या यशा बद्दल सांगताना सिद्धांत सांगतो, की आयआयटीयन बनण्याचे स्वप्न घेऊन 2019 मध्ये तो कोटा मध्ये गेला होता. कोटा मध्ये त्याला अभ्यासासाठी पूरक आणि पोषक वातावरण मिळाले. कारण उत्तम विद्यार्थी तेथे शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच लॉकडाऊन दरम्यान शिक्षकांकडून मिळालेल्या सहयोगा बद्दल सिद्धांत ने खास नमूद केले.

JEE मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सिद्धांतला दहावी मध्ये 98.4% मिळाले होते. सोबतच सिद्धांताने एनएसइजेएस स्टेज -1 मध्ये संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पाठवला आहे. सिद्धांत ने क्विस कॉमनवेल्थ निबंध प्रतियोगिता मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

भविष्यात आयआयटी मुंबईच्या कॉम्पुटर सायन्स मधून बीटेक करून सीएस फिल्ड मध्ये काही नवीन उपक्रम
करून इनोवेटिव इंडिया मध्ये हातभार लावण्याची इच्छा सिद्धांत ने व्यक्त केली. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्या या यशाचा डंका आता सर्वदूर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा वाजतोय कारण सिद्धांतला केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधून पुढील शिक्षणासाठी ऑफर लेटर मिळालं आहे.

सिद्धांत मुखर्जी सोबतच साकेत झा, गुरमीत आणि अनंतकृष्ण यांनीसुद्धा टॉप-100 मध्ये आपले स्थान बनवले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments