खूप काही

स्मार्ट जमान्यातील स्मार्ट फॅन ; फीचर्स बघून तुम्हीसुद्धा व्हाल याचे फॅन !

AC , कूलर या उपकरणांमुळे विजेचं बिल सुद्धा वाढतं तर काहींना AC च्या हवेचा त्रास सुद्धा होतो. पण मग अशा परिस्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न उद्भवतोच! परंतु आता यावर एक उत्तम पर्याय सध्या बाजारात आला आहे. ते म्हणजे कमी किमतीचे, दिसायला आकर्षक आणि रेमोर्टवर चालणारे Smart Fan.

वाचक मित्रांनो गर्मीला सुरवात झाली आहे. दुपार होते ना होते उन्हाच्या तीव्र झळा बसायला सुरवात होते. थंड पाण्याच्या बाटल्या आता फ्रिज मध्ये सजू लागल्या आहेत. अशातच सर्वाना ओढ लागते ती शांत थंड आल्हाददायक अशा वाऱ्याची पण गर्मी मध्ये तर वारे सुद्धा उन्हाचे चटके देतात. आणि मग शोधा शोध सुरु होते AC , कूलर ची पण या उपकरणांमुळे विजेचं बिल सुद्धा वाढतं तर काहींना AC च्या हवेचा त्रास सुद्धा होतो. पण मग अशा परिस्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न उद्भवतोच! परंतु आता यावर एक उत्तम पर्याय सध्या बाजारात आला आहे. ते म्हणजे कमी किमतीचे, दिसायला आकर्षक आणि रेमोर्टवर चालणारे Smart Fan. (The new remote control smart fans)

हे फॅन रेमोर्टवर चालत असल्याने यांना हाताळणं अगदी सोपं आहे, वारंवार उठून फंखा चालू बंद करण किंवा वेग कमी जास्त करण हे बसल्या जागेवरून शक्य आहे. शिवाय दिसायला अतिशय आकर्षक आणि स्टयलिश असल्याने घराला एक वेगळाच मॉडर्न लुक मिळतो. बाजारात अनेक कंपन्यांनी असे रेमोर्टवर चालणारे फॅन लाँच केल्याने ग्राहकांना क्वालिटी, डिजाईन, किंमत यात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या फॅन्स बद्दल.

Orient Remote wendy smart fan :  ओरिएंट कंपनीचा हा फॅन मार्केट मध्ये तुम्हाला सहज 3००० – 4००० रुपयांत उपलब्ध होईल. हा फॅन तुम्ही रेमोर्ट ने कंट्रोल करू शकता. याला तुम्ही 5 स्पीड पर्यंत वाढवू शकता. 

ब्लॅक गोल्ड रंगात हा फॅन उपलब्ध आहे. याची एक कमी म्हणजे हा फॅन व्हॉइस कमांड वर चालत नाही. 

Orient Electric Ecotech Plus Smart Fan : ओरिएंट कंपनीचा हा फॅन तुम्हाला 2००० – 3००० रुपयांपर्यंत मिळेल. ब्राउन रंगात हा फॅन अधिकच उठून दिसतो. याचा स्पीड ५ पर्यंत वाढवता येतो. तसेच कंपनीचा दावा आहे की, हा फॅन कमी आवाज करतो व अतिशय थंड हवा देतो. 

Atomberg Efficio Smart Fan : Atomberg कंपनीच्या स्मार्ट फॅन हा तुम्हाला 2००० ते 3००० पर्यंत विकत घेऊ शकता. या फॅनचा स्पीड 5 असून ब्लड स्वीप साईज 12०० mm आहे. या फॅनला बाजारात सध्या चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. 

Ottomate Genius Premium Smart Fan : Ottomate कंपनीचा फॅन अतिशय कमी किमतीत तुम्ही खरेदी करू शकता. या फॅनच वैशिष्ट्य म्हणजे यात टर्बो मोड आहे. त्यामुळे कूलिंग लवकर होते. याचा लुक बाकीच्या फॅन्सच्या तुलनेत साधासा असला तरीही कमी किंमतीत हा उत्तम असा पर्याय आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments