कारण

Sharad Pawar : शरद पवार रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांसाठी whats app स्टेटस

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल केले असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) दिली आहे. रविवारी सांयकाळी पोटात दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. (Sharad pawar Health news)

रविवारी सायंकाळी पोटात दुखू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचे निदान समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातले कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळींनी आपल्या whats app स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिली आहे. (Supriya Sule’s whats status about Sharad Pawar’s illness)

येत्या 31 मार्च रोजी शरद पवार यांच्यावर एंडोस्कोपी शस्त्रक्रिया (Endoscopic surgery) करणार असल्याची माहितीही समोर येत आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Minority Development Minister Nawab Malik) यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे.

sharad pawar health news supriya sule stetus

रविवारपासून अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्या पोटात दुखत असल्याने तपासणीसाठी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तिथे तपासण्या झाल्यानंतर पित्ताशयाचा त्रास असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे, त्यामुळे येत्या 31 तारखेला एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

supriya sule whats stetus
supriya sule whats stetus

वडिलांसोबत राहावं लागणार यामुळे खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील पुढील दोन आठवड्यांचे आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. (sharad pawar health news)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments