खूप काही

Mahashivratri 2021: मुंबई, नाशिक, इचलकरंजी आणि राज्यातील अनेक देवस्थाने महाशिवरात्री दिवशी बंद

Mumbai: आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण आहे. आजच्या दिवशीच महादेव आणि माता पार्वती विवाह बंधनात अडकले होते. असे पुराणात मानले जाते.महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधिनुसार व्रत करतो, त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते.

दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते मात्र यावर्षी कोरोनामुळे हा सण साधेपणात साजरी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. राज्यात कारोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.यासागळयाचा विचार करत राज्यभरातील महत्त्वाची सर्व शिव मंदिर आज भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी बाबुलणाथ मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे.अंबरनाथचे शिव मंदिर, पुण्यातील श्री शंकर भीमाशंकर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदीर, शहापूर मधील गंगा देवस्थान बंद ठेवण्यात आलेले आहे.

Nashik मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात lajor show करण्यात आलेला आहे मात्र मंदिर भाविकांसाठी बंद आहे.नागपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे.इचलकरंजीतील सगळी शिव मंदिरं बंद ठेवण्यात येणार आहे. जरी राज्यभरात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी काही ठिकाणी online पद्धतीने दर्शन चालू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments