फेमस

हातपाय तुटले तरी साथ सोडली नाही, जगाला प्रेमाचा संदेश देणारं वर्ल्ड बेस्ट कपल…

ही त्या दोघांची कहाणी आहे, जे दोघे आज जगभरात व्हायरल होत आहेत.

जगात प्रेम अजूनही शिल्लक आहे, हे दाखवणाऱ्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि दिसतही असतात, अशीच एक घटना आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत. (The best couple in the world who sent a message of love to the world)

प्रेमाला जात, धर्म, वय, शहर, देश अशा कुठल्याच सिमा नसतात. सिमा असतात त्या फक्त आपुलकीच्या, मायेच्या आणि काळजीच्या. दाऊद सिद्दीकी आणि सना या दोघांची कहाणी देखील अशाच काही गोष्टींची जाणीव करून देणारी आहे. दाऊद आणि साना एकमेकांवर इतकं प्रेम करतात, की सगळ्यात मोठी संकटे आल्यावरही ते दोघे वेगळे झाले नाहीत. (The story of Dawood Siddiqui and Sana Mushtaq has proven true the age)

doctors removed his limbs but she did not leave him the love story of sana and dawood 1616235510 9804नोव्हेंबर 2020 मध्ये दाऊदच्या कुटुंबियांनी सनाच्या कुटुंबियांना जेवायला बोलावले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच सुरु होतं. सना आणि तिच्या घरचे दाऊदच्या घरी पोहोचण्याआधी एक मोठा अपघात झाला.

हा अपघात सना आणि त्यांच्या घरच्यांसोबत नसून खुद्द दाऊदसोबत झाला. दाऊद एका विजेच्या खांबाला धडकला होता आणि त्यात तो संपूर्णरित्या जळाला होता. डॉक्टरांनी संपूर्ण आशा सोडून दिल्या होत्या, तरीही डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचा विचार केला, तेही एका अटीवर. दाऊदला जिवंत ठेवायचं असेल, तर दाऊदचे हात आणि पाय कापावे लागतील.

doctors removed his limbs but she did not leave him the love story of sana and dawood 1616234459 8994

ही घटना ज्यावेळेस सनाला समजली, त्याचवेळेस तिने हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली, दाऊदला पाहून जरी तिला आश्चर्य वाटलं. असं असलं तरी धाडस करून सनाने दाऊदाच्या कानात काही शब्द बोललेले, ते दोन शब्द ऐकूण काही क्षणात दाऊदचे डोळे उघडले.

दाऊद म्हणतो की ज्यावेळेस सनाचा आवाज माझ्या कानांवर पडला, त्यावेळेस लगेच त्याच्या मनात आलं की सनाचे काय होईल? एखाद्यावेळेला आपल्या सोबत झालेली दुर्घटना पाहून सना आपल्यासा सोडून गेली तर, अशा अनेक विचारांनी दाऊदचं मन भरून निघत होतं. कारण त्याच्या शेजारीच असलेल्या एका रुग्णाला त्याचे बोट कापले होते म्हणून तिची पत्नी सोडून गेली होती.

doctors removed his limbs but she did not leave him the love story of sana and dawood 1616234646 1616

मात्र सनाच्या मनात काही वेगळेच विचार सुरु होते. सनाने त्याच्या कानात इतकच म्हटलं होतं की काहीही झालं तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही. अपघातानंतर 40 दिवस दाऊद वाचण्याचे एकही संकेत डॉक्टर देत नव्हते, तरीही सना त्याला सोडायला तयार नव्हती. सनाची प्रार्थना, विश्वास आणि प्रेम यांच्या ताकदीवर अखेर सनाला दाऊद मिळालाच. (Love story of Dawood and Sana)

पाकिस्तानातल्या लाहौरमधील ही घटना असून अनेक देशांसह भारतातही या प्रेमविरांचं कौतूक केलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments