आपलं शहर

Bhiwandi Covid Hospital : त्या कोरोना हॉस्पिटलमधील आगीला जबाबदार कोण?

गुरुवारी अर्ध्या रात्री मुंबईतील भांडुपमधील 4 मजली ड्रीम्स मॉल च्या टॉप फ्लोर वर सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागली. दुर्घटना स्थळावरून 11 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्या. स्थानिक वृत्तानुसार सादर करण्यात आलेल्या माहिती नुसार यांपैकी 2 कोरोना रुग्ण होते,ज्यांचा मृत्यू आधीच झाला होत. उर्वरित 9 लोकांचा मृत्यू गुदमरून झाला आहे.

गुरुवारी अर्ध्या रात्री मुंबईतील भांडुपमधील 4 मजली ड्रीम्स मॉल च्या टॉप फ्लोर वर सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागली. दुर्घटना स्थळावरून 11 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्या. स्थानिक वृत्तानुसार सादर करण्यात आलेल्या माहिती नुसार यांपैकी 2 कोरोना रुग्ण होते,ज्यांचा मृत्यू आधीच झाला होत. उर्वरित 9 लोकांचा मृत्यू गुदमरून झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, यांमधील 7 लोक व्हेंटिलेटर होते. त्यांच्या सोबतच्या इतर 2 रुग्णांना वाचवण्यात अपयश आले आहे. (The Bhiwandi Covid Hospital)

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, हे 107 बेड्स ची क्षमता असलेलं हॉस्पिटल एका अशा मॉलच्या टॉप फ्लोर वर सुरु करण्यात आले होते, ज्यात मल्टिप्लेक्स, शॉप्स, खाण्या-पिण्याची दुकान, बैंक्वेट हॉल, रेस्तराँ आणि बार आहेत. ही घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण आहे. सनराईज हॉस्पिटल ज्याला एक कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले होते. त्यात OPD, ICU आणि CCU सुद्धा होते. मॉल मध्ये असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन ची सुविधा सुद्धा देण्यात आली होती. परंतु या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये फक्त एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे, फायर सेफ्टी म्हणजेच अग्निसुरक्षा यंत्रणा. मुंबई फायर सर्विसेस ने या मॉलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिले नव्हते. पण तरीही टॉप फ्लोरला हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.
आग मॉलच्या पहिल्या फ्लोरवरील एका दुकानापासून सुरु होऊन झपाट्याने टॉप फ्लोर पर्यंत पोचली हॉस्पिटलमध्ये अग्निशामक यंत्रणा तर होती, परंतु आगीमुळे पसरलेल्या धुराला आटोक्यात आणण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. रुग्णांना सुरक्षित बाहेर पाडण्यासाठी कोणताच रस्ता नव्हता.

धक्कादायक गोष्ट तर ही आहे की, मॉलच्या तिसऱ्या फ्लोरवर कोविड हॉस्पिटल आणि दुसऱ्या फ्लोरवर बैंक्वेट हॉलमध्ये पार्टी चालू होत. याच मॉलच्या पहिल्या फ्लोरवर गुलजार नावाचे दुकान होते जिथे दररोज अनेक लोक येत जात असत. एकूण पाहता एकाच छताखाली कोरोना रुग्ण, पार्टी आणि शॉपिंग सर्रासपणे चालू होते.

ज्यावेळेस मॉलमध्ये आग लागली त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये 78 रुग्ण भरती होते. आग लागल्याची बातमी मिळताच अग्निशामक दलाच्या 22 गाड्या घटना स्थळी उपिस्थत झाल्या. हॉस्पिटल मधील 67 रुग्णांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुरवातीला मॉलच्या टॉप फ्लोरवर कोविड सेंटर ची बातमी ऐकून आवाक झाल्या होत्या परंतु जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कोरोना रुग्णांसाठी बेड आणि व्हेंटिलेटर ची कमी असल्याने मॉल मध्ये हॉस्पिटल सुरु करण्याची परवानगी दिल्याचे जाहीर करताच पेडणेकरांनी आपले सूर बदलले.

सध्यपरिस्थित मुंबई पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनावर निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी FIR दाखल केली आहे. मुंबई पोलीस कमिशनर यांनी सांगितले आहे की, जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाही करण्यात येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments