खूप काही

लग्नामध्ये नवरी मुलगी इतकी रडली, की थेट हार्ट अटॅक आला…

लग्न करून सासरी जात असताना अनेक मुली जुन्या आठवणीने आश्रू गाळत असतात. आपल्या कुटुंबाला सोडून जात असताना त्यांना दु:ख अनावर झालेलं असतं, ते सगळं दु:ख रडून नवरी मुलगी व्यक्त करत असते. मात्र अशा प्रसंगात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (The bride cried so much at the wedding that she had heart attack)

ओडिसाच्या सोनपूर येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरी आपल्या सासरी जात असताना इतकी रडली की तिला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

शुक्रवारी ओडिसाेच्या सोनपूरमध्ये हा लग्न सोहळा सुरु होता. जुलांडा गावातील मुरली साहू यांची कन्या बलांगीरचे लग्न टेटलगावच्या बिसीकेसनसोबत होत होते. त्यावेळेचा सगळा आनंदाचा माहोल काही क्षणात दु:खामध्ये मिसळून गेला.

लग्न मंडपातून निरोप घेताना नवरी मुलगी एकसारखी रडत होती. या सगळ्यात ती अचानक बेहोश होऊन जमिनीवर पडली. उपस्थित असलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र खूप वेळ होऊनही ती जागे झाली नाही. अखेर तिला डुंगूरिपालीतल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे हृदय विकाराचा धक्का आल्याने संबंधित नवरी मुलगीचा मृत्यू झाला आहे, माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वीच नवरी मुलीने आपल्या वडिलांना गमावलं होतं, त्यानंतर तिच्या मामाने आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता, अशी माहिती जुलुंडा गावातील एका नागरिकाने दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments