खूप काही

केळ्याच्या सालीचा करा असा वापर; चेहऱ्यावर येईल हरवलेलं तेज आणि वाढेल दातांची चमक !

एक केळ आपल्या पोटाची भूक भागवू शकतो. केळ्यातील घटकांमुळे एक केळ जरी खाल्लं तरीही आपलं पोट भरल्यासारखं जाणवत आणि लगेच भूकही लागत नाही. शरीरात ताकद ही येते. केळ्याला बाकी फळांप्रमाणे धुवून कापून बिया काढून खाण्या इतके कष्ट घ्यावे लागत नाहीत म्हणून हे सर्वांचं आवडीचं फळ आहे. हे केळ जर आपण शिऱ्यात टाकलं तर त्याला प्रसादच स्वरूप प्राप्त होत. हे झाले केळ्याचे उपयोग पण केळ्याच्या सालीचे काय ? चला तर मग जाणून घेऊयात केळ्याच्या सालीचे दैनंदिन जीवनातील फायदे. (The different uses of Banana and they can fix all of your skin, teeth and hair related problems.)

 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, केळ्याच्या सालीमुळे त्वचा उजळू शकते, पिवळे पडलेले दात स्वच्छ, शुभ्र आणि चमकदार होऊ शकतात, एवढंच काय तर केसांच्या अनेक समस्या सुद्धा ही केळ्याची साल दूर करू शकते. 

कसं ? चला तर पाहूयात कसा करावा केळ्याच्या सालीचा उपयोग 

 

 केळ्याच्या सालीचा उपयोग त्वचेसाठी :

 •  केळ्याच्या सालीला त्वचेवर घासल्याने त्वचा उजळते आणि सुरकुत्या सुद्धा कमी होतात. 
 • सॊबतच चेहऱ्यावरील मुरूम डाग कमी व्हायला सुद्धा मदत होते. 
 •  केळ्याची साल चेहऱ्यावर घासल्यानंतर काही काळ तशीच ठेवली तर त्वचा हायड्रेट होते. 
 • सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सूज येत असल्यास केळ्याची साल लावावी. 

 

 केळ्याच्या सालीचे उपयोग केसांसाठी: 

 • केळ्याची साल ब्लेंडर मध्ये वाटून घेऊन पेस्ट बनवून केसांना लावल्याने केस मऊ होऊन दाट होण्यास मदत होते. 
 • केस जर तेलकट असतील तर या पेस्ट मध्ये एलोवेरा जेलचा समावेश करावा. 
 • केस कोरडी असतील तर एक चमचा खोबरेल तेलचा समावेश करावा . 
 • केस गाळण्याची समस्या असेल तर याच पेस्ट मध्ये पपई चा समावेश करून वापरल्याने केसगळती लवकरच थांबेल. 
 • आपल्याला हवी तशी पेस्ट बनवून केसांना लावून घ्यावी १०-१५ मिनटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्यावे. 

 

 केळ्याच्या सालीचे उपयोग दांतांसाठी:

 • केळ्याची साल दातावर घासली तर दातांवरचा पिवळट थर निघून जातो. 
 • दात स्वच्छ होतात आणि चमकू लागतात. 
 • तसेच, हिरड्यांच्या कोणत्याही समस्या यामुळे दूर होऊ शकतात. 

 

 अगदी नैसर्गिक आणि स्वस्त असा हा उपाय नक्कीच करून बघा. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments