खूप काही

दिवसातून तीन-चार वेळा परफ्युम मारत असाल तर सावधान !

परफ्यूममुळे होऊ शकतो कॅन्सर !

सध्या बाजारात नवीन नवीन ब्रँडचे परफ्यूम येत आहेत. उन्हाळ्यात शरीराला येणारा घाणेरडा वास टाळण्यासाठी अनेकजण परफ्यूमचा वापर करतात.

हल्ली स्त्रियांचे आणि पुरुषांचे वेगवेगळ्या ब्रँडचे परफ्यूम उपलब्ध आहेत. पॉकेट परफ्यूम आणि विविध प्रकारकचे, सुगंधाचे, ब्रँडचे परफ्यूम आहेत. परंतु हे परफ्यूम आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.(The disadvantages of perfume)

परफ्यूममुळे अनेकदा त्वचेची ॲलर्जी होते. परफ्यूम तयार करण्यासाठी आणि ते जास्त काळ सुगंधित ठेवण्यासाठी त्यात वेगवेगळी रसायने मिसळली जातात. त्याचबरोबर अनेक प्रकारचे पदार्थ मिसळले जातात. यामुळे त्वचेला त्रास होतो व त्वचेचे रोग उद्भवतात.

परफ्यूममध्ये अनेक प्रकारची रसायने असतात ही रसायने आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे जळजळ जाणवू लागते. काही वेळा त्वचेवर पुरळ येतात. व्यंधत्व आणि कर्करोग यांसारख्या गंभीर रोगांचा सामना करावा लागतो.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार परफ्यूममध्ये अनेक रसायने असतात, ज्यात अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही दिवसातून तीन-चार वेळा परफ्यूम मारत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments