फेमस

Video :आंबे घेताना केलेली ही चूक पडली महागात; यामुळे झाली फराह खान ट्रोल

जर एखादी मोठी दिग्गज व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करताना दिसली तर नेटकऱ्यांना नवीन आणि आयत मिम मटेरिअलच मिळत ट्रोल करायला. बॉलीवूड ची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आंबे विकत घेताना केलेल्या एका चुकी मुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट उठत आहे. सरकार, प्रसारमाध्यम, आरोग्य व्यवस्था सर्व जनतेला कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना वारंवार बजावत आहे. तरीही काही ठिकाणी या नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यातूनही जर एखादी मोठी दिग्गज व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करताना दिसली तर नेटकऱ्यांना नवीन आणि आयत मिम मटेरिअलच मिळत ट्रोल करायला. (The Farah Khan getting troll by netizens for taking mask off while purchasing mangos.)

सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे फराह खान. बॉलीवूड ची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आंबे विकत घेताना केलेल्या एका चुकी मुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याच झालं असं की, फराह खानचा आंबे विकत घेताना चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात फराह रस्त्यालगतच्या एका आंबे विक्रेत्याकडून आंबे विकत घेत होती, फराह ने मास्क लावला होता सोबतच चांगल्या दरात उत्तम आंबे देण्यास फराह विक्रेत्याला सांगत होती. परंतु आंब्याचा सुगंध घेण्याचा मोह फराहला आवरता आला नाही. फराह ने आपला मास्क खाली सरकवत आंब्याचा सुगंध अनुभवला खरा पण ऐन कोरोना काळात आंब्याचा वास घेण्यासाठी मास्क खाली करण्याचा निष्काळजीपणा केल्यामुळे फराह सोशल मीडियावर नेटकऱ्यांद्वारे चांगलीच ट्रोल झाली.

या व्हिडिओ मध्ये फराह अनेक आंब्यांना हाथ लावून वास घेताना दिसत आहे. या गोष्टीमुळे ती कोरोना ला आवाहन देत असल्याचे नेटकऱ्यांनी आपल्या कंमेंट्स मध्ये म्हटले आहे. फराहचा हा व्हिडिओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर ‘कीप काम अँड ईट युअर आम’ अशा कॅप्शन सोबत पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments