भुक्कड

Summer Day : तुम्हालाही उन्हाचा त्रास होतोय, मग कलिंगड करेल सगळे त्रास दूर…

उन्हाळ्यात कलिंगडचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात कलिंगड दिसू लागतात. उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे खूप फायदे आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कलिंगड हे फळ लोकप्रिय आहे. कलिंगड गोड आणि थंड असल्याने अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड खाण्याला प्राधान्य देतात. उन्हाळ्यात कलिंगडचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे…

कलिंगडामधून विटामिनस ए, बी आणि विटामिनस सी खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात.अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो ऍसिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते.(The health benefits of eating watermelon)

कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहतं आणि चिडचिड कमी होते.

कलिंगड नियमित खाल्याने पोटाचा त्रास कमी होतो. रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.

उन्हाळ्यात ऊन्हामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. कलिंगड चेह-यावर लावल्यास चेहरा ताजातवाणा होते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.

कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही.

कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

पोटॅशियम असल्यामुळे हे आपल्या किडनीला स्वस्थ ठेवण्यास मदत करते. युरिन मधला जो ऍसिड चा स्तर आहे त्यावर नियंत्रण राहते. व आपला किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते . किडनीस्टोन होण्याचा धोका कमी होतो .

कलिंगड हे डोळ्यांसाठी खूप लाभदायी आहे.रातांधळेपणा आणि मोतीबिंदू या सारखे डोळ्यांचे आजार होण्यापासून दूर राहता येते .

कलिंगड मध्ये व्हिटॅमिन सी आणि पाण्याची मात्रा भरपूर प्रमाणात असते . व्हिटॅमिन सी आपल्या शरीरारातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments