आपलं शहर

शिमग्याआधीच मुंबईकरांना उन्हाच्या झळा, एकीकडे कोरोना दुसरीकडे गरमी…

‘Weather Alert’ येत्या 48 तासात मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या सर्वाधिक झळा लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (The heat increased in Mumbai)

एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे मुंबईकरांना उष्णतेने हैरान केले आहे. गुरुवारी दुपारी मुंबईतील कमाल तापमान 39 अंश होते. त्याचबरोबर उपनगरामध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आाहे. तर पालघरच्या ठिकाणी कमाल तापमान 41 अंश तापमानाची नोंद झाल्याने काळजी वर्तवली जात आहे.

एका बाजूला हमानातील उष्णता वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचे दुहेरी संकट पुन्हा निर्माण होत असल्याने काळजी वर्तवली जात आहे. नागरिकांनी आरोग्यासह आहाराचीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केली जात आहे.

वेळोवेळी पाणी पिणे, शरीरामध्ये थंडावा राखणारा भाजीपाला खाणे, फळं खाण्याचा दिनक्रम नागरिकांनी सुरु करावा, अशा सुचनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (In Mumbai, the heat increased with the corona)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments