खूप काही

Amazon App Logo : हिटलरची ती गोष्ट लक्षात येताच Amazon ने बदलला आपला लोगो…

मुंबई : मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्याच्या अ‍ॅपचा लोगो मध्ये बदल केला आहे. या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या लोगोची तुलना ही हिटलरच्या चेहऱ्याशी झाल्यानंतर त्यावर लवकर पावले उचलली. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या नव्या लोगोवर सर्व जगभरातील काही युजर्सकडून यावर टीकेची भावना येत आहे .

जुन्या लोगोमध्ये काय होतं?

अ‍ॅमेझॉनने आत्ताच काही काळापूर्वी त्यांच्या अ‍ॅपचा लोगो बदलला होता. व त्या नव्याकोऱ्या लोगोमध्ये ब्राऊन रंगाचा एक बॉक्स होता. पॅकिंग बॉक्स मध्ये असलेल्या या चौकोनाच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाची खूण होती. ही निळी खूण म्हणजे सेलोटेपचं चिन्हं होतं. तर मध्यभागी अ‍ॅमेझॉनचा सिग्नेचर अ‍ॅरो होता.

नवीन लोगो काय?

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपचा लोगो बदलून काही आठवडे होत नाहीत, तोच जगभरातील ग्राहक लोकांनी टीकेला सुरुवात केली.त्यामधे ब्ल्यू स्ट्रीप म्हणजे जर्मनीतील हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या ‘आयकॉनिक’ मिशीसारखी वाटत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर निळ्या पट्टीलं भाग बदलून नव्या स्वरुपात लोगो सादर करण्यात आला आहे.

Myntra च्या लोगोवरुनही वाद:

ई कॉमर्स कंपनी मिंत्राने (Myntra) काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या अ‍ॅपचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला. मुंबईमधील एका महिलेच्या तक्रारीनंतर मिंत्राने (myntra)हा निर्णय घेतला. मिंत्राच्या या लोगोमुळे महिलांच्या भावना दुखावल्या जात असून, हा लोगो त्यांचा अपमान करणारा आहे, असा आरोप एका महिलेने केला होता. या महिलेने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता मिंत्राने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments