कारण

देवेंद्र फडणवीसांनी आणलेला बॉम्ब भिजलेला लवंगी फटका निघाला, संजय राऊतांचा टोला

‘ते कागद गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल, त्या अहवालाला काडीचाही डाँ नाही. तो अहवाल जारी करावा आणि तुम्ही जर तो वाचला तर, सरकारला अडचणीत आणेल अशी कोणतीही ओळ त्या अहवालात नाही. तो अहवाल भिजलेली लवंगी आहे. ’ असं संजय राऊत म्हणाले. 

(The press meet of Sanjay Raut. Sanjay Raut targeted and attack Devendra Fadanvis and BJP through his answers.)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सध्या राज्यात मनसुख हिरेन, वाझे आणि परमवीर सिंह या विषयांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांचं शीतयुद्ध महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. दोन्हीकडील नेते अत्यंत आक्रमक होऊन आपली बाजू बरोबर सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याच संदर्भात केल्या गेलेल्या टीकांना प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाहुयात काय म्हणाले राऊत? (The press meet of Sanjay Raut.)

  • काय आहे  CBI चौकशी ?
  • असं काही नाही ! मी तुम्हाला सांगतो
  • भाजपाच्या दुट्टप्पी पणावर निशाणा
  • राजकीय समीकरण बदलणार?

 

पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सादर केलेल्या अहवालाबद्दल विचारले असता, ‘ते कागद गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल, त्या अहवालाला काडीचाही डाँ नाही. तो अहवाल जारी करावा आणि तुम्ही जर तो वाचला तर, सरकारला अडचणीत आणेल अशी कोणतीही ओळ त्या अहवालात नाही. तो अहवाल भिजलेली लवंगी आहे. ’ असं संजय राऊत म्हणाले. 

 

काय आहे  CBI चौकशी ? :

पत्रकारांनी परमवीर सिहांच्या पत्रा प्रकरणी केल्या जाणाऱ्या CBI चौकशी बद्दल विचारलं त्यावर काय आहे CBI चौकशी ? असं परखड उत्तर राऊतांनी यावेळी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी या घटने बद्दल आधी मुख्यामंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, महाराष्ट्राची इब्रत राखायला हवी होती. असं मत राऊत यांनी मंडळ सोबतच योग्य वेळ साधून  ‘घरातल्या गोष्टीला किंमत नसल्याने ही गोष्ट दिल्लीपर्यंत गेली’ असा टोला सुद्धा लगावला. 

 

असं काही नाही ! मी तुम्हाला सांगतो :

परिषदेदरम्यान पत्रकारांनी मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल विचारलं तेव्हा पक्षाची बाजू मांडताना  राऊतांनी, ‘असं काही नाही ! मी तुम्हाला सांगतो जर कोणत्याही अधिकाऱ्याचं अशा प्रकारचं कोणतही आक्षेपार्ह संभाषण झालं असेल तर त्या बद्दल योग्य तो निर्णय घ्यायला गृह खात आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत. विजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची सवय दिल्लीला आहे म्हणून आम्ही याला गांभीर्याने घेत नसून  गंमत म्हणून पाहतो.’ असं म्हटलं आहे.

 

भाजपाच्या दुट्टप्पी पणावर निशाणा : 

परमवीर सिंहांच्या पत्रावरून हा गोंधळ सुरु झाला आहे. आणि त्यांच्याच आग्रहाखातर महाराष्ट्रात CBI Enquiry बंद केली होती. आणि आता तेच तपासासाठी जात आहेत.  ज्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहकार्य करतात.’ अस संजय राऊत यावेळी म्हणाले. सोबतच  यापेक्षाही गंभीर आरोप असलेली पत्र याआधी अनेक राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या-त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना दिल्याचे स्पष्ट करताना संजीव भट आणि शर्मा यांनी गुजरातच्या मुखमंत्र्यांना लिहलेल्या पत्राचा संदर्भ राऊतांनी दिला. तसेच अशा पात्रांसोबत काय होत ते विरोधीपक्ष नेत्यांना चांगलंच माहित आहे. असा बोचरा टोला ही राऊतांनी यावेळी लगावला. 

 

यासर्व प्रकरणा बाबत मुख्यमंत्री काही बोलणार का असा प्रश्न उपस्थित झाला त्यावर ‘आम्ही सर्व तान्हाजी मालुसरे आणि बाजी प्रभूंचे वशंज आहोत. आमचं काम आहे आमच्या प्रमुखासाठी लढणं. ते राज्यकर्ता आहेत. त्यांना राज्य करु द्या आम्ही सक्षम आहोत लढण्यासाठी. मुख्यमंत्री योग्यवेळी समोर येतीलच .’ असं रोखठोक प्रतिउउतर राऊतांनी दिल. 

 

फडणवीस आणि राज्यपाल यांच्या भेटी बद्दल राऊतांच मत विचारण्यात आले त्यावेळी ही त्यांच्या घरातील गोष्ट आहे. हे सर्व BJP चे कार्यकर्ते आहेत. असा टोला लगावत राज्य काय राज्यपाल चालवतात का? राज्यपालांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटा असा संदेश ही राऊतांनी येथे दिला. तसेच महाविकास आघाडीच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांना मंजुरी न देण्यामागे भाजपा ची इच्छा असून राजभवन राजकीय अड्डा झाला आहे त्यामुळे टीका टिपण्णी होणारच असा चंपकाचा फटकारा सुद्धा राऊतांनी लगावला. 

 

सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीवर विश्वास नसल्यचेही राऊत या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘कोर्टात न्याय कशा प्रकारे होतो हे सर्वाना स्पष्ट आहे. जर कोणाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायचे असेल तर तिथे ही जाऊ.’  शिवाय अनिल देशमुख पदावर राहतील अशी घोषणा ही राऊतांनी जातेवेळी केली. 

 

राजकीय समीकरण बदलणार?

पत्रकार परिषदे अंती कोण्या एका पत्रकाराने महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार का असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर मी पाच वर्षांनंतर देईन असे उडवाउडवीचे उत्तर राऊतांनी दिले. 

 

महाराष्ट्रात चालेल्या या राजकीय चकमकीचा शेवट नक्की काय होणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. सध्याच्या काळातील ज्वलंत मुद्दे  म्हणजेच वाढती महागाई, कोरोना,बेरोजगारी, सुरक्षितता या सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. या राजकीय भांडणात नेते समाजकारण विसरत जात आहेत, त्यात मुख्यमंत्रीनी अद्यापही याविषयवरील आपले मौन सोडले नाही आहे,  पवारांची पॉवर कुठं पर्यंत किल्ला राखू शकेल याचा अंदाज नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य नक्की कोणाच्या हाती? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments