खूप काही

Video : दारू तस्करीचा असा जुगाड; आनंद महिंद्रा यांनी शेयर केला व्हिडीओ आणि म्हणाले ‘खूप चतुर,पण…’

या व्हिडीओमध्ये एक इसम ट्रक घेऊन जात असताना त्याला पोलीस अडवतात आणि ट्रक ची तपासणी सुरु करतात, त्यादरम्यान पोलिसांना ट्रकच्या खालच्या भागात एक छुपं ड्रॉवर सापडत. या ड्रॉवर मध्ये तस्करी केलेल्या दारूच्या अनेक बाटल्या होत्या, बाहेरून पाहता कोणाला अंदाजही येणार नाही अशी ही युक्ती. परंतु, आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस खात्याने या शहा ला मात दिली. 

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींची अनधिकृतरित्या तस्करी केली जाते, तस्कर हा माल ठरल्या जागी पोहचवण्यासाठी  वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. अनेक छुपे रस्ते, साधन -सामग्री अवलंबतात परंतु, आता एका अशा दारू तस्करीचा व्हिडीओ समोर येत आहे, जो स्वतः महिंद्रा इंडस्ट्रीचे मालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर करत एक महत्वाचा संदेश दिला आहे.  ( the Smuggling case which will blow your mind.)

या व्हिडीओमध्ये एक इसम ट्रक घेऊन जात असताना त्याला पोलीस अडवतात आणि ट्रक ची तपासणी सुरु करतात, त्यादरम्यान पोलिसांना ट्रकच्या खालच्या भागात एक छुपं ड्रॉवर सापडत. या ड्रॉवर मध्ये तस्करी केलेल्या दारूच्या अनेक बाटल्या होत्या, बाहेरून पाहता कोणाला अंदाजही येणार नाही अशी ही युक्ती. परंतु, आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस खात्याने या शहा ला मात दिली. 

हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केला आणि म्हणले, ‘अत्यंत चतुर प्रयत्न, पण मी तुम्हाला सांगु इच्छितो की, अशा प्रकारचं पीक अप ट्रकच डिझाईन आम्ही कधी केलं नाही आणि कधी करणार ही नाही. 

याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही जण तस्करांच्या हुशारीचा कौतुक करत आहेत तर काही जण पोलिसांच्या सतर्कतेच कौतुक करत आहेत. तस्करीच्या अशा योजना पाहून खरच डोकं भणभणून जात या विचाराने की, एवढी हुशारी देश घडवण्यात लावली असती तर, आज आपला देश महासत्ता झाला असता.  

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments