फेमस

एक अभिनेत्री, तर एक क्रिकेटरची पत्नी, दोघी सेम टू सेम

या जगात एकसारखे दिसणारे अनेक लोक असतात.असं म्हणतात की एकसारखे दिसणारे सात लोक एका वेळेस या जगात असतात. या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच नातं नसतं तरीही यांच्या चेहऱ्यामधील साम्य इतकं असतं की पाहणारा ही गोंधळून जाईल. आज आपण जाणून घेणार आहोत अश्या दोन प्रसिद्ध व्यक्तीं बद्दल ज्या अगदी हुबेहूब सारख्या दिसतात.( The two famous public figures who look exactly similar.)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना आणि युझवेन्द्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा चहल या दोघीही दिसायला हुबेहूब सारख्याच आहेत. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं इतकं साम्य ! आश्चर्य म्हणजे या दोघी बहिणी नाहीत तरीही चेहऱ्यामधील इतक साम्य पाहून या बहिणी नाहीत या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही.

सुरभी चंदना ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नागिन 5 मध्ये सुरभी आदि नागिन च्या मुख्य भूमिकेत दिसली होती. चाहत्यांकडून ही सुरभीला तिच्या या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळालं होत. याआधी सुरभी ईशकबाज, संजीवनी या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती. ईशकबाज या मालिकेमुळे सुरभीला तिची ओळख मिळाली. यात तिने साकारलेल्या निर्भीड, पंगेखोर, मिश्किल, अनिका या पत्राने लोकांच्या मनावर राज्य केलं.
नागिन 5 बानी ही आदिनागिन ची भूमिकाही सुरभी ने उत्तम निभावली.

धनश्री वर्मा चहल हिची ओळख फक्त क्रिकेटर युझी चहल याची पत्नी एवढीच नसून, धनश्री एक उत्तम डान्सर, कोरिओग्राफर आणि डेंटिस्ट सुद्धा आहे. धनश्री एक उत्तम डान्सर असल्याने ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वर तिचे डान्स व्हिडिओ पेश करत असते. धनश्री ने बॉलीवूड मधील मोठं मोठे चेहरे म्हणजेच गुरु रंधावा, राजकुमार राव, मोनी रॉय यांसोबत डान्स करतानाचे विडिओ शेयर केले आहेत. धनश्री चा ओय होय होय हा मुसिक अल्बम 12 मार्चला रिलीज होणार आहे. ज्यात धनश्री पंजाबी गायक जस्सी गिल सोबत दिसणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments