खूप काही

विराट रन मशीन आवारात पुन्हा सज्ज: नावी नोंदवले हे दोन वर्ल्ड रेकॉर्ड

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर सध्या भारत विरूद्ध इंग्लंड 5 सामन्यांची T20 मॅच रंगत आहे. या मॅच च्या पहिल्या सामन्यात भारताला हार स्विकारावी लागली परंतु काल झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारताने दमदार खेळी खेळत विजय आपल्या नावे करून घेतला आहे.
सोबतच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने जागतिक क्रिकेट मधील दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने सात विकेटनी विजय मिळवला सोबतच मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कढून अपेक्षित कामगिरी साधली जात नव्हती त्यातून इतकी महत्वपूर्ण मॅच…, आता काय होणार याची धास्ती सर्वांना वाटू लागली असताना विराट ने आपले रन मशीन अवतार धारण केले आणि या सामन्यात विराट ने नाबाद 73 धावा केल्या. विराटने 49 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकांसह ही खेळी खेळली.

विराट च्या नावी या विक्रमांची नोंद:

इंग्लंडविरुद्धच्या 73 धावाच्या खेळीत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा कर्णधार बनला आहे.  कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने कर्णधार म्हणून 15 हजार 440 धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये विराटच्या नावी दर्ज झालेला आणखी एक विक्रम म्हणजे टी-20 मध्ये त्याने 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ३ हजारचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

विराट च्या या विक्रमी खेळी नंतर भारतीय संघाचा आणि चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण देश भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा करत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments