खूप काही

मुंबईतून कोरोना पॉझिटिव्ह पोहोचला थेट गावी, संपूर्ण राज्य हादरलं…

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक उपाय योजना केल्या जात आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पून्हा वाढू लागल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे, अनेक लोक पुन्हा मुंबई सोडून आपल्या गावी जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे, अशी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. (the villager escaped from mumbai and got infected the team is monitoring)

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एक तरुण मुंबईतून थेट आपल्या गावी म्हणजेच उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये पोहोचला आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने इतका लांब प्रवास केल्यामुळे दोन्ही राज्यातील आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.

गाझीपूर बिरनो पोलिस स्टेशन परिसरातील मलेठी गावात दोन दिवसांपूर्वी किशोर नावाचा व्यक्ती पोहोचला आहे. गावी जात असताना मुंबईच्या रेल्वे स्थानकावर त्याने आपली कोरोना चाचणी केली होती. मात्र गावी पोहचल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले. ही बाब समजताच आरोग्य पथकाने उत्तर प्रदेशच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन संबंधित व्यक्तीला आरोग्य विभागाच्या ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सध्या संपूर्ण मलेठी गाव क्वारंटाईन केलं असून तिथल्या अनेकांना सक्तीचे होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. संबंधित तरुणाला सध्या घरात विरगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, याशिवाय आरोग्य विभागाचं एक पथक त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर लक्ष देऊन आहे. (the villager escaped from mumbai and got infected corona possitive)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments