कारण

Sachin Vaze: “या प्रकरणातला एकच भाग समोर, दुसरा भाग महत्वाचा”; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या प्रकरणाचा तपास एपीआय सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र आता त्याच प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“वाझे प्रकरण गंभीर..”
सचिन वाझे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मी हे प्रकरण सभागृहात मांडले होते. NIA ने जी कारवाई केली त्यामध्ये अनेक पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातला एकच भाग समोर आला आहे, दुसरा भाग हा महत्वाचा आहे, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या या विधानाने ‘पिक्चर अभी बाकी हैं’ असंच म्हणावं लागेल. त्यामुळे दुसरा भाग काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

“कोरोनाचं कारण देत वाझेंना कामावर परत घेतलं..”
सचिन वाझे यांना हायकोर्टाने निलंबीत केले होते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस शिवसेना त्यांना कामावर परत घेण्याची मागणी करत होती. मात्र त्यांना कामावर परत घेणं योग्य नव्हतं. परंतू ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण देत वाझेंना पुन्हा कामावर रूजू केलं. त्यासोबतच त्यांना सर्व महत्वाच्या केसेस देण्यात आल्या, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, वाझेंची अटक ही सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “संजय राऊत जे म्हणाले ते हास्यास्पद आहे.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments