कारण

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील उद्याची सुनावणी होणार ऑनलाईन

मराठा आरक्षण या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलेले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. याच मुद्यावरून सध्याचे सरकार आणि आधीचे सरकार यांमध्ये अनेकवेळा वादविवाद झालेले आहेत. विधीमंडळात देखील अनेकवेळा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतो.

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडत नसल्याचा आरोप सातत्याने विरोधीपक्ष भारतीय जनता पक्ष आणि मराठा समाजातील नेत्यांकडून वेळोवेळी केला गेला आहे. दरम्यान, उद्या (8 मार्च) सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. उद्यापासून नियमितपणे मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर होणारी ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल असा विश्वास मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments