खूप काही

COVID-19: Universe Boss क्रिस गेलने ‘या’ गोष्टीसाठी मानले पंतप्रधान मोदींचे आभार..

वेस्ट इडिंजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘या’ खास गोष्टीसाठी आभार मानले आहेत.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘Universe Boss’ या नावाने ओळखला जाणारा क्रिस गेल (Chris Gayle) याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘व्हॅक्सिन मैत्री (Vaccine Maitri)’ या अभियानांतर्गत भारताने विविध देशाना लस पुरविण्याची मोहिम हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत भारताने मेड-इन-इंडिया लस जमाईकाला मागच्या आठवड्यात पुरविली. म्हणूनच इंडिया इन जमाईका (India in Jamaica) यांच्या ट्विटर हँडलवरून क्रिस गेलने एक व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

“आदरणीय पंतप्रधान मोदी, भारतातील सर्व जनता आणि भारत सरकारचे मी, जमाईकाला लसींचा पुरवठा केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आम्ही तुमचे ऋणी आहोत, खूप खूप आभार,” अशा शब्दांत क्रिस गेलने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

भारत सरकारकडून जमाईकाला लसीचे 50,000 डोस पुरविण्यात आले आहेत. हे डोस प्राप्त होताच जमाईकाच्या पंतप्रधानांनी भारताचे आभार मानले. “आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की आज दुपारी आपल्याला भारत सरकारतर्फे AstraZeneca लसीचे 50,000 डोस प्राप्त झाले आहेत. आम्ही भारत सरकारचे आणि भारतातील जनतेचे यासाठी आभार मानतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments