खूप काही

Video : Vantas Explainer : Big bull vs Scam 1992 : बीग बूल आणि स्कॅम 1992 मध्ये बीग फरक काय?

अभिषेक बच्चनचा बीग बूल आणि स्कॅम 1992 मध्ये बीग फरक काय आहे? ह्याचा ‘वंटास एक्सप्लेनर’ या विशेष सदरात घेतलेला हा आढावा.

हा ट्रेलर आहे बिग बुल (big bull) या नवीन चित्रपटाचा. जो काही तासातच व्हायरल होत आहे. यात विशेष गोष्ट अशी आहे, की या चित्रपटात मुंबईतील मोठा घोटाळेबाज हर्षद मेहताची बायोपिक दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. द बिग बुल सिनेमाची कथा 1990 ते 2000 दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारित आहे.

सण 1992 मधील घोटाळ्यावर एक वेब सीरिज web series ही आली आहे, तिचं नाव आहे scam 1992. ही सीरिज बॅकग्राऊंड म्युझिक, कलाकार, हुबेहूब दाखवलेली स्टोरी या सर्व गोष्टींमुळे सुपरहिट झाली होती.

लोकांकडून या वेबसिरीसला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या वेब सिरीजचे 10 एपिसोड प्रेक्षकांनी मन भरून पाहिलेत. हेच सर्व बिग बुल या काही तासाच्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहेत.

या चित्रपटामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन अभिनेत्री इलियाना, निकिता, अजय देवगन हेदेखील अभिनय साकारताना आपल्याला दिसतील.

या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, हर्षद मेहताचे पात्र साकारताना दिसत आहे. बघायला गेलो तर बिग बुल चित्रपट जरी स्कॅम 1992 सारखा असला तरी यामध्ये एकसुद्धा डायलॉग किंवा बॅकग्राऊंड म्युझिकची कॉपी केलेली नाही नाही.

या वेब सीरिजमध्ये हर्षद शांतीलाल मेहताची गोष्ट सांगण्यात आली आहे. एक असा माणूस, जो शून्यातून हिरो होतो आणि नंतर भारतातला सर्वात मोठा घोटाळा करणारा खलनायकही होतो. ही कथा 90 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर तयार झाली आहे. त्यानंतर आता हर्षद मेहतावर बिग बुल हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार आहे. अभिषेक बच्चनने ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज पाहून त्याचे कौतूक सोशल मीडियावर केले आहे. बिग बुल मेकर्सने अभिषेक बच्चनला दमदार डायलॉग दिलेत, जे ट्रेलरमधून दिसून येत आहेत. डायलॉगसच्या जोरावर हा चित्रपटदेखील वेब सीरिज इतका हिट होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा चित्रपट 8 एप्रिल 2019 ला रिलीज होणार आहे. त्यामुळे बघूया स्कॅम 1992 पेक्षा अभिषेक बच्चन नेमका किती बिग बुल ठरतो ते, अशाच मनोरंजनातल्या खास स्टोरी पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी वंटास एक्सप्लेनरला नक्की भेट द्या.

संपूर्ण व्हिडिओ पहा:-

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments