खूप काही

IND vs ENG: विराट कोहलीने भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी -20 आय सामन्यात रचला नवा विक्रम…

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी -20 आय : भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक विशेष विक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली 12000 धावा करणारा तिसरा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला 12000 धावा करण्यासाठी फक्त 17 धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत दुसर्‍या टी -२० मध्ये विराटने तब्बल 17 धावांचा आकडा पार करताच या खास यादीमध्ये प्रवेश केला आहे .

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. पॉन्टिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 15440 धावा केल्या आहेत, तर कर्णधार म्हणून ग्रॅमी स्मिथने 14878 धावा केल्या आहेत. परंतु पहिल्या टी -20 मध्ये विराट कोहली एकही रन न बनवता बाद झाला होता.

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 12000 धावा करण्याचा चमत्कार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 226 डावात विराटने हे विशेष स्थान गाठले आहे. त्याचबरोबर पॉन्टिंगने 282 डावात हा विक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 294 डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या.

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 ओवरमध्ये 6 खेळाडू गमावून 164 धावा केल्या. इंग्लंडकडून जेसन रॉयने 46 धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी 2-2 विकेट मिळवल्या. चहल आणि भुवी 1-1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरले.

टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3000 धावा पूर्ण :

दुसर्‍या टी -20 सामन्यात विराट कोहलीने 49 चेंडूत 73 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. कोहली शेवटपर्यंत खेळत राहिला आणि शेवटी भारताला जिंकवून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीने टी -20 आंतरराष्ट्रीयमध्येही 3000 धावा पूर्ण केल्या. जागतिक क्रिकेटमध्ये कोहली टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments