फेमस

Video: सर विवियन रिचर्ड्स यांनी केली सचिनची मनसोक्त तारीफ, पाहा काय आहे कारण

मुंबई: जगभरात क्रिकेटचा देव म्हणून जो ओळखला जातो, मास्टर ब्लास्टर अशी उपमा ज्याला मिळालेली आहे, शतकांचे शतक ज्याने केलं आहे त्या सचिन तेंडुलकरचे वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी गौरवोद्वार काढले. रिचर्डस ह्यांनी सचिन बद्दल असलेल्या भावना आणि प्रेम एक व्हिडिओ ट्विट करत व्यक्त केलं.

अन्अकॅडमीने सचिनच्या करीअरचा खास आढावा देणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.2.15 मिनिटाच्या या व्हिडिओ मध्ये सचिन काय होता? सचिनने देशासाठी आणि क्रिकेटसाठी काय केलं? सचिनचा खेळ आणि सचिन नावाची जादू काय होती? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

“यशाचा आवाज मोठा असतो, पण परिश्रमाची शांतता जोरात व्यक्त होते. त्यासाठी स्वप्नांना पुन्हा जिवंत करा, मार्ग पुनर्निमित करा. जे लोक हा मार्ग तोडतात ते हार मान्य करतात”, असं या ट्वीटमध्ये म्हणण्यात आलंय. व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्यात अपयशहे चॅम्पियन्ससाठी एकप्रकारे इंधन असतं अशा वाक्याने करण्यात आलेली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments