खूप काही

सभेला उशीर झाला म्हणून प्रियंका गांधींनी केलं हे, पाहा व्हिडिओ

तेजपूर: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी ह्या निवडणुका जवळ येतायत म्हणून आसाममध्ये प्रचार सभा घेत आहेत.एका मागोमाग दिवसाला अनेक ठिकाणी उपस्थित राहून त्या अनेक प्रचारसभा घेत आहेत म्हणून त्यांची खूप धावपळ होते. असच एक प्रसंग आज आसामच्या सभेत झाला. सभेला उशीर झल्याणे प्रियंका गांधींनी थेट धावण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या सोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि नेते सुद्धा धावायला लागले.

प्रियंका गांधी 2 मार्चला आसाममधील तेजपुरमध्ये रॅलीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना तिथे पोहचायला उशीर झाला.त्यामुळे जेव्हा त्या प्रचारसभेच्या मैदानावर पोहचल्या तेव्हा त्यांनी धावण्यास सुरुवात केली. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला. काँग्रेसच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचंही प्रमाण मोठं होतं. प्रियंका गांधी येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.

प्रियंका गांधींनी सभेत अनेक घोषणा केल्या. काँग्रेसच सरकार आलं तर आसाममध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू होऊ देणार नाही असा आश्वासन त्यांनी दिलं आणि 200 युनिट मोफित वीज, 5 लाख नोकऱ्या आणि गृहिणींच्या सन्मानासाठी 2000 रूपये देणार असल्याच ही त्या म्हणाल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments