आपलं शहर

मनसेने पर्दाफाश केलेल्या वरळीतील पबवर कारवाई कधी, मनसेचा सवाल

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांच्या मतदार संघात मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या एका पबचा व्हिडिओ मनसे नेते संतोष धुरी (MNS leader Santosh Dhuri) यांनी समोर आणला आहे. त्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना फक्त फक्त आदेश नको तर कारवाईची कृती हवी, ते पब सील करण्यात यावे, अशी मागणी संतोष धुरी यांनी केली आहे. (What action will be taken against the pub in Worli, MNS question)

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नियम मोडणाऱ्या पब आणि बारवरती कारवाई करणार असे सांगितले असले तरी नेमकी काय कारवाई करणार हे मात्र सांगितले नाही. त्यांच्या मतदारसंघातला हा पब आहे. काल मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा असं वाटलं की या पबमध्ये कोरोनालाच बंदी आहे. कोणत्याही नियमाचे पालन या ठिकाणी करण्यात येत नव्हते. तात्काळ या पबवरती कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासनाचा वचक या व्यावसायिकांवर असला पाहिजे, असे धुरी यांनी सांगितले आहे.

काय आहे पूर्ण प्रकार?
कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून धुरी यांनी फेसबुक लाईव्ह केल आहे. या पबमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओतून समोर येत होत. यावेळी पबमध्ये शारीरिक अंतरदेखील पाळण्यात येत नव्हते. अनेकांच्या चेह-यावर मास्क नव्हते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हा प्रकार सुरू असल्याने धुरी यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचे सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे, पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे असेही धुरी म्हणाले होते. (What action will be taken against the pub in Worli, MNS question)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments