खूप काही

मोठ्या रक्कमेनं सोन्याची किंमत घसरली, काय आहेत लेटेस्ट सोन्याचे भाव…

एकदम वाढलेल्या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडा संपत असताना सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किंमती मोठ्या रक्कमेने कमी झाल्या आहेत. सध्या झालेली सोने, चांदीमधील घसरण ही मागील 10 महिन्यांतील सर्वात जास्त घसरण समजली जात आहे. (Gold Prices Down ₹12,000 From Record Highs, Check letest Rate in Mumbai)

आजच्या घडीला सोन्याची किंमत प्रतितोळा 45 हजार 300 रुपये इतकी आहे, तर चांदीची किंमत प्रतितोळा 66 हजार 500 रुपये प्रतिकिलो आहे. सोन्याच्या किंमतीत तब्बल 1200 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 3 हजारांची घसरण झाली आहे.

7 मे 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने 45 हजारांचा टप्पा पार केला होता, तो आजपर्यंत चढ्या दरानेच होता, त्यानंतर आज पहिली वेळ सोन्याची किंमत 45 हजारांच्या जवळपास आल्याचं चित्र आहे. ऑगस्ट 2020 मध्ये प्रतितोळा सोन्याची किंमत 56 हजार 254 इतकी होती. याच्या तुलनेत सध्या सोन्याच्या किंमतीत तब्बल 12 हजारांची घसरण झाली आहे. तर चांदीची किंमत प्रतितोळा 10 हजारांनी कमी झाली आहे.

तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 45 हजार प्रतितोळा असलेल्या सोन्याची किंमत अजून घसरण्याची शक्यता आहे. तोच दर 42 हजारांपर्यंत जाऊ शकतो.

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्यामागे केंद्र सरकारची महत्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारने सोन्याची इम्पोर्ट ड्युटी अडीच टक्क्यांनी कमी केल्याने देशातील सोन्याचे दर कमी झाले आहेत. जगातील डॉरल इंडेक्स कमी झाल्यानेदेखील सोन्या चांदीचे दर कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

शहर22-k सोने (per 10 gm)24-k सोने (per 10 gm)
चेन्नईRs 41,840Rs 45,630
कोलकाताRs 43,820Rs 46,520
बंगलुरुRs 41,450Rs 45,220
पुणेRs 43,430Rs 44,430
हैदराबादRs 41,450Rs 45,220
अहमदाबादRs 43,950Rs 45,850
लखनौRs 43,600Rs 47,560
केरळाRs 41,450Rs 45,220

गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 43,950 रुपयांवरून घसरून 43,600 रुपये झाली आहे, तर मुंबईत आज तेच दर 43,430 वर विकले जात आहेत. (Gold prices fell by a huge amount, what are the latest gold prices)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments