कारण

Sachin Vaze Case : वाझेंच्या सोसायटीतील CCTV चं रहस्य काय? मुख्य सुत्रधार कोण?

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात दिवसेंदिवस नवनविन खुलासे समोर येत आहेत. अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि चर्चेतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. असाच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे, तो म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा. (What is the secret of CCTV in Waze’s society)

सचिन वाझेंचे ठाण्यातल्या साकेत सोसायटीमध्ये राहतात. तिथल्या सीसीटीव्हींची चौकशी केल्यानंतर मात्र तिथल्या 51 कॅमेरांचे फुटेज नेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोसायटीतील अनेक सीसीटीव्हींचं फुटेज 2 मार्चलाच घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुकेश अंबानींच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली कार सापडल्यानंतर 2 मार्च रोजी अँटिलिया प्रकरणाचा तपास स्वतः सचिन वाझेंकडे होता. त्यामुळे हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल राजकीय स्तरातून विचारला जात आहे.

सोसायटीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मुंबईहून आल्याचे समजते, ते कोणत्या शाखेचे, कुठल्या परिसरातून आले, याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

6 मार्च रोजी अंबांनींच्या घरासमोर सापडलेल्या कारचा तपास हा ATS कडे देण्यात आला होता. त्यानंतर NIA नेदेखील या तपासाकडे आपलं लक्ष वळवलं आहे. स्वतःच्याच सोसायटीतले फुटेज नेऊन ते नष्ट करण्याचा वाझेंचा प्रयत्न होता का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, मात्र NIA कडून कोणताच खुलासा न झाल्याने या सगळ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Sachin Vaze Case: What is the secret of CCTV in Vaze’s society? Who is the main facilitator?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments