फेमस

काय आहे असं खास, ज्यामुळे Mukesh Ambani यांचा Antilia बंगला असतो चर्चेत | Vantas Mumbai

सध्या चर्चेत असलेल्या जगातील गर्भश्रीमंत मुकेश अंबानी यांचं घर नेमकं कस आहे याचाच आढावा आज आपण घेणार आहोत,

दक्षिण मुंबईत एंटिलिया हे एक खास घर आहे. हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांचे निवास स्थान आहे.

मुकेश अंबानी यांचे नाव जगातील 15 श्रीमंत पुरुषांच्या यादीमध्ये आहे. याचबरोबर मुकेश अंबानी जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या व भारतातील पहिल्या आणि सगळ्यात महागड्या घराचे मालक आहेत.
अनेक प्रगत सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या घराचे नाव एन्टिलिया जे मुम्बईमध्ये आहे.
27 मजली असलेल्या या आलिशान घराची अंदाजित किंमत 2 बिलियन डॉलर आहे. या घरात 168 कारसाठी 7 मजले राखीव आहेत. यासह त्यात स्विमिंग पूल, बॉलरूम, 3 हेलीपॅड, मंदिर, गार्डन, 2 मजली हेल्थ सेंटर आणि 50 लोकांची क्षमता असलेले सिनेमागृह आहे.

11 हजार कोटींनी तयार करण्यात आलेल्या एंटिलामध्ये 600 कर्मचारी काम करतात,
कर्मचार्यांविषयी सांगायचे झाले तर त्यांचा पगार हा अंदाजे एखाद्या मुख्य सरकारी अधिकार्यांएवढा असतो. येथे प्रत्येक कर्मचार्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातात .येथे कर्मचार्‍यांना 7 तारांकित हॉटेलसरख्या सुविधा उपलब्ध आहेत. या 27 मजली घरात प्रत्येक फ्लोरमध्ये एक-एक हेड कर्मचारीआहेत, प्रत्येक मजल्याच्या मॅनेजरचा वर्षाचा 2 कोटी पगार मिळतो, तर तुम्हाला अंदाज येईल, अंटेलियामध्ये अजून काय सुविधा असू शकतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments