कारण

Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पावर कोण, काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्याचा 2021-22 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पावर राज्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्षाने मात्र या अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोण, काय म्हणाले?

अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना दिलासा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“यंदाच्या अर्थसंकल्पामधून समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. कृषी, शिक्षण, उद्योग, दळणवळण अशा सर्व क्षेत्रांना कुठेही मागे न राहता गती देण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. कोणतेही रडगाणं न गाता सर्वांसाठी दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.”

सर्व घटकांना बरोबर घेत अर्थसंकल्प मांडला: उपमुख्यमंत्री अजित पवार
“आम्ही हा अर्थसंकल्प सर्व घटकांना बरोबर घेऊन मांडला आहे. कोरोना महामारीमुळे आपल्या देशातील आरोग्यव्यवस्थेवर काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्यातून आम्ही 7500 कोटींचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यामधून आरोग्यविषयक सर्व सोयी सुविधा देण्याचे काम आम्ही करणार आहोत. यंदा जागतिक महिला दिनी पहिल्यांदा अर्थसंकल्प आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीने हे ठरवले की यातून महिलांनाही आपण दिलासा द्यायचा. त्याप्रमाणे आम्ही तसा निर्णय घेतला आहे.”

“हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की…”: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
“राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला, युवा आणि मागासवर्गीय अशा सर्व घटकांचा अपेक्षाभंग करणारा आहे. हा अर्थसंकल्प केवळ रडगाणे आहे. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की एखाद्या विशिष्ट भागाचा असा प्रश्न आम्हाला पडला आहे. पण एकूणंच या अर्थसंकल्पाबाबत ज्याकाही अपेक्षा होत्या त्याबाबत निराशा या अर्थसंकल्पात झाली आहे.”

सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न: जयंत पाटिल
“या अर्थसंकल्पातून सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषत: रस्ते, जलसंपदा आणि इन्फ्रास्ट्र्क्चरमध्ये राज्य सरकारने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कोरोनामुळे जी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे त्याला वेग येईल असे मला वाटत आहे.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments