खूप काही

World Sleep Day: या ट्रिकने 2 मिनिट मध्ये येते झोप, युद्धाच्या वेळेस सैनिक याचा उपयोग करतात

दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी जागतिक झोप दिवस (world sleep day) केला जातो.लोकांमध्ये झोप आणि आरोग्याचं महत्त्व पसरवन हे या दिवसाचं ध्येय आहे.काही लोक असे असतात की त्यांना अंथरुणात गेल्यावर लगेच झोप येते पण काही लोकांना रात्र रात्रभर झोप येत नाही.ही मिलिट्री ट्रिक लगेच झोपण्यासाठी कामाला येईल.

झोप लगेच यावी म्हणून सैनिकांमध्ये या खास ट्रिकचा वापर केला जातो ज्याने 2 मिनिट मध्ये झोप येते.ही ट्रिक अमेरिकन आर्मी वापरते.”रिलैक्स ऐंड विन: चैंपियन परफॉर्मेंस” या नावाच्या पुस्तकात या बद्दल माहिती दिलेली आहे.

ट्रिक: चेहऱ्यावरील सगळ्या समसल्स मोकळ्या करा.जीभ, जबडा, डोळे आणि यांच्या जवळच्या मासपेशींना मोकळ करा.आपले खांदे जेवढे खाली जाऊ शकतात तितके खाली करा.वरच्या आणि खालच्या हाताला देखील खाली हलवा. श्वासोच्छ्वास करा, छाती आणि पाय मोकळे करा.या नंतर 10 सेकंदमध्ये डोक्यातून सगळे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा.या 2 चित्रांपैकी एका चित्राचा विचार करा – एक म्हणजे आपण शांत तलावाच्या काठावर पडलेले आहात आणि वर पूर्णपणे निळे आकाश आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही काळोख असलेल्या रूममध्ये वेलवेटच्या झोपाळ्यावर झोपलेले आहात.10 सेकंद पर्यंत विचार करू नका, विचार करू नका, विचार करू नका अस परत परत बोला.

झोपेसाठी आपल्याला 3 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे – बेडरूम आणि बेड आरामदायक असले पाहिजे, शरीराला आराम आणि मन शांत असावे.झोपायला जादूई कोणताही मार्ग नाही, आपण आपल्यासाठी काय कार्य करीत आहे हे शोधावे लागेल, ते पुस्तक वाचण आहे की नाही, गरम पाण्याने आंघोळ करण असो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments