फेमस

6 6 6 6 युवराज सिंहने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये 4 षटकार लावले

भारतीय क्रिकेट संघाचे पूर्व स्टार ऑलराउंडर युवराज सिंह ( Yuvraj Singh) परत एकदा जुन्या अंदाज मध्ये फलंदाजी ( batting) करताना दिसले.त्याने शनिवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मध्ये जी फलंदाजी केली ते बघून 2007 च्या T-20 वर्ल्डकपची आठवण झाली.

युवराजने दक्षिण आफ्रिका लेजेंड्सच्या विरोधात 4 षटकार मारले.जांदेर दे ब्रूएन ने 18वी ओव्हर टाकली. युवराजने पहिला बॉल डॉट खेळला आणि त्या नंतरचे 4 ही बॉल त्याने 4 षटकार मारले. ओव्हरचा शेवटचा बॉल युवराजने डॉटच खेळला.जांदेर दे ब्रूएनच्या या ओव्हरमध्ये 24 रन बनले

युवराजने एकूण मिळून 22 बॉलचा सामना केला आणि नाबाद 52 रन बनवले. 2 चार आणि 6 षटकार मारले.सचिन तेंडुलकरनेही 60 रन बनवले.युवराज आणि सचिनच्या अर्धशतकांमुळे भारत लेजेंड्सने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 3 विकेट गमावून 204 धावा केल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments