आपलं शहर

मुंबईकरांमुळे पोलिसांवर संकट, अनेकजण कोरोनाचे शिकार, तर…

मुंबई पोलिसांना देखील कोरोनाची लागण, 7 दिवसात 209 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. विविध शहरांमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सध्या प्रशासनाने अनेक नियम लागू केले आहेत.

प्रशासनाने घेतलेल्या निर्णया सोबतच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा याकरिता मेहनत करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांवर देखील गंभीर परिणाम झाला आहे. सात दिवसात मुंबई पोलिसांचे 209 कर्मचाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाचा देखील मृत्यू झाला होता.(Mumbai police also infected with corona)

अत्यावश्यक सेवेत असल्याने मुंबई पोलिसांच्या 70 टक्के पोलिसांना व्हॅक्सिन पहिला डोस दिला गेला आहे. 11 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 30756 पोलिसांना व्हॅक्सिनचा डोस दिला गेला आहे. यामध्ये 2 हजार 690 पोलीस अधिकारी आणि 2 हजार 806 पोलीस शिपाई यांचा देखील समावेश आहे. जवळपास 17 हजार 351 पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला गेला आहे. 1 हजार 325 पोलिस अधिकाऱ्यांनी दुसरा डोस घेतला असून 16 हजार 026 इतक्या पोलीस शिपायांनी देखील दुसरा डोस घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 11 एप्रिल 2019 पर्यंत 797 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 7 हजार 442 पोलीस कर्मचारी उपचार घेऊन बरे देखील झालेले आहेत. तर 454 पोलीस कर्मचारी अजूनही उपचार करत आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे मुंबई पोलिसांचे 101 कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments