आपलं शहर

मुंबईतील अनेक व्हॅक्सिनेशन सेंटर होणार बंद, थेट ‘या’ तारखेला उघडणार दारे…

राज्यातल्या अनेक ठिकाणी कोरोनावर उपायकारक असणाऱ्या कोव्हॅक्सिनचा तुटवडा जाणवू लागला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी कोव्हॅक्सिनचा तुडवडा जाणवू लागल्याने चिंता वर्तवली जात आहे. याचेच पडसाद मुंबईमध्येही दिसू लागले आहेत. मुंबईतील तब्बल अनेक कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबईत एकूण 118 ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या 33, राज्य आणि केंद्र सरकारच्या 14 तसेच खासगी रुग्णालयात 71 केंद्रांवर लसीकरण केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सुरु असलेल्या खासगी रुग्णालयातील 71 केंद्रांपैकी 26 केंद्र बंद करण्यात आली आहेत.

9 एप्रिलच्या सायंकाळपर्यंत 26 केंद्र बंद होतील. तर उर्वरित केंद्रे 10 एप्रिलपासून बंद होतील. लसीचा साठा कमी असल्याने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महापालिकेची काही केंद्र बंद होण्याच्या वाटेवर आहेत. कोव्हॅक्सिनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत, ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा 15 एप्रिलला मिळणार असल्याने तोपर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बिकेसीतील सर्वात मोठे लसीकरण केंद्रही आता लसीकरणासाठी बंद करण्यात आलं आहे. आधी माहिती न दिल्याने केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र जोपर्यंत लसींचा पुरवठा होणार नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी, 9 एप्रिल रोजी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, मात्र मुंबईत लागणाऱ्या लॉकडाऊनच्या भीतीने अनेकजण मुंबई सोडण्याचा विचार करत आहेत, याचाच एक भाग म्हणून मुंबई राहणारे अनेक परप्रांतिय नागरिक मुंबई सोडून आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी करताना दिसत आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments